New PF Rules: संसदेत नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget) सादर केला. या देशाच्या बजेटमध्ये पीएफ (PF) संदर्भात काही निर्णय घेतल्यामुळे, पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमातच बदल करण्यात आला आहे. हा काय बदल आहे, हे समजून घेवुयात.
काय झाला बदल? (What has Changed)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अर्थसंकल्प मांडला. त्यांनी यावेळी पीएफ संदर्भात अनेक निर्णय घेतले असल्याचे सांगितले. त्यापैकी ‘टीएस रेट’विषयी त्यांनी माहिती दिली. त्या म्हणाला, यापूर्वी ईपीएफमधून पैसे काढल्यानंतर शासनाला 30 टक्के टीडीएस भरावा लागत होता. आता हाच टीडीएस रेट कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये आता शासनाव्दारे ईपीएफमधून पैसे काढल्यानंतर 20 टक्के टीडीएसचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे साहजिकच ईपीएफमधून पैसे काढल्यानंतर तुम्हाला फक्त 20 टक्केच टीडीएस भरावा लागणार आहे.
आणखी काय होणार फायदा (What Else will Benefit)
ईपीएफमधून अजून ज्या लोकांनी पैसे काढले नाही, अशा लोकांना जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. कारण टीडीएस कमी केल्याचा लाभ या लोकांना घेता येणार आहे. तसेच ईपीएफओमध्ये ज्यांचे पॅनकार्ड रेकाॅर्डसह अपडेट केले नाहीत, त्यासाठी पीएफ काढण्यावर काही किरकोळ दराने कर कापण्याची जी अट होती, ती अट देखील काढून टाकण्यात आली आहे. यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे दिसत आहे. हे लोक आता 20 टक्केच टीडीएस भरण्याचा नियमांअंतर्गत असतील. हा बदल करण्यात आलेला नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येणार आहे.