Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

After Buying Home Documents: घर खरेदी केल्यानंतर 'या' 5 गोष्टी करायला कधीच विसरू नका

After Buying Home Documents

After Buying Home Documents: घर घेतल्यानंतरही बरीच कागदपत्रे गुंतवणूकदाराला दैनंदिन कामामध्ये उपयोगी पडत असतात.

After Buying Home Documents: आपलं हक्कचं घर असावं हे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येकजण आपल्या आयुष्यभराची मिळकत खर्ची घालतात. काही जण जागा खरेदी घेऊन घर बांधतात तर काही जण एखाद्या सोसायटीमधील फ्लॅट(Flat), डेव्हलपरने बांधलेला बंगला(Bungalow), किंवा आधीच कोणी राहत असलेले घर विकत घेतात. ही प्रक्रिया तुलनेने सोपी असली, तरी घर घेतल्यानंतरही पुढे काही कागदपत्रांचीही(Documentation after buying home) गरज असते. चला तर असे कोणते कागदपत्र घर खरेदीनंतरही लागतात याबद्दल जाणून घेऊयात.

प्रॉपर्टींच्या कागदपत्रांसंदर्भात एक फाईल बनवा

कोणतेही घर(Home) किंवा प्रॉपर्टी(Property) विकत घेतल्यानंतर त्यासंबंधी सर्व कागदपत्रांची एक फाईल करुन ठेवणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन पेपर्स, सेल डीड (Sale Deed), जमिनीचे रेकॉर्ड्स (name in the land records) म्हणजे सातबाराचा उतारा, बँकेच्या कर्जाची कागदपत्रे(Bank Loan Documents), कर्ज ज्या खात्यामध्ये आहे त्याची माहिती, बिल्डर-बायर अग्रीमेंट (builder-buyer agreement) आणि अशा बऱ्याच गोष्टींची कागदपत्रे नीट एका ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच, स्टॅम्प ड्यूटी (stamp duty) दिली गेली आहे का हे तपासणे गरजेचे आहे, जर स्टॅम्प ड्यूटी दिली नसेल, तर भविष्यात स्टॅम्प डिपार्टमेंटकडून रिकव्हरी नोटीस (recovery notice) मिळू शकते.

कागदपत्रांची True Copy बनवा

घर घेण्यासाठी आपण कर्ज(Loan) घेतलेले असते. अशा वेळी बँका सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स(Original Documents) त्यांच्या ताब्यात ठेवतात. त्यापूर्वी सर्व कागदपत्रांची ‘ट्रू कॉपी’ (True copy) करुन ठेवणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स (Photocopy) घेऊन त्या मॅजिस्ट्रेट किंवा नोटरीच्या शिक्क्याने ‘ट्रू कॉपी’ (How to make true copy of documents) बनवून घेऊ शकता किंवा ज्या ठिकाणी सेल डीड रजिस्टर (Register sale deed) करण्यात आले आहे, त्या सब-रजिस्ट्रार कडून कागदपत्रांची कॉपी मिळवू शकता. केवळ घराचीच नाही, तर कर्ज आणि इतर संबंधित गोष्टींच्या कागदपत्रांचीही फोटोकॉपी बनवणे गरजेचे आहे.

घरची नोंदणी करा

दुसऱ्यांच्या नावावर असलेले घर तुम्ही खरेदी करत असाल तर तुम्हाला तातडीने त्या प्रॉपर्टीचे म्युटेशन (Property mutation process) करणं गरजेचे आहे. म्हणजेच, महापालिकेच्या लँड रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये जुन्या मालकाऐवजी तुमच्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. सेल टायटल डीड (Sale title deed) रजिस्टर झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करायची असते. यासाठी तुमची प्रॉपर्टी महापालिकेच्या हद्दीत येते की नाही यावर हे अवलंबून असते. तसेच, प्रत्येक राज्यामध्ये यासंदर्भातील नियम (Property mutation rules) आणि प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. जर पुढे जाऊन तुम्हाला ही प्रॉपर्टी विकायची असेल तर म्युटेशन केलेले असणे आवश्यक आहे.

बेसिक गरजांची कागदपत्रे नावावर करा

महापालिकेमध्ये किंवा स्थानिक प्रशासनाकडे जाऊन पाणी(Water), लाईट(Light) आणि गॅस(Gas) अशा कनेक्शन्सची (Municipal supplies registration) कागदपत्रे आपल्या नावावर करुन घेणे गरजेचे असते. याशिवाय सोसायटीमध्ये फ्लॅट विकत घेत असाल, तर संबंधित रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनशी(RWA) संपर्क साधणे तितकेच गरजेचे आहे.

प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर ह्या गोष्टी तर नक्कीच करा

रिअल इस्टेट ऍडव्हजरच्या म्हणण्यानुसार नवी प्रॉपर्टी(New Property) विकत घेतल्यानंतर आपलं मृत्यूपत्र (Will) तयार करणे; किंवा आहे त्या मृत्यूपत्रात बदल करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे. मृत्यूपत्र नसेल तर त्या संपत्तीवरुन पुढे कुटुंबात मोठे वाद होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या पश्चात आपल्या संपत्तीचे काय करायचे हे आधीच ठरवणे गरजेचे आहे. यासोबतच, आपले बँक रेकॉर्ड(Bank Records), आधार कार्ड(Aadhar Card) आणि इतर आवश्यक ठिकाणी आपला नवा पत्ता अपडेट(New Address Update) करणे तितकेच महत्त्वाचे आहे.