Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Advantage and Disadvantage of Investing in Plot : प्लॉटमध्ये गुंतवणूक करताय, जाणून घ्या फायदे-तोटे

Plot, Real Estate, Flat, Investment in Plot

Advantage and Disadvantage of Investing in Plot : जमिनीतील गुंतवणूकीचे लाभ आहेत तसेच तोटेही आहेत. आपण गुंतवणूक करत असलेली जमीन कुठे आहे? आपली आर्थिक क्षमता काय आहे? भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा काय आहेत, अशा बाबींचा सरासर विचार करूनच प्लॉटमधील गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा.

गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेटचा विचार करताना वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर येत असतात. भूखंडामध्ये (प्लॉट) गुंतवणूक करण्याविषयीच्या जाहिराती आपण वृत्तपत्रात बघतो. ज्या किमतीत फ्लॅट (सदनिका) मिळतात त्याच्या अगदी 10 टक्के किमतीतही प्लॉट मिळू शकतो. Plot किंवा Flat याविषयी  जाहिराती आपल्याला आकर्षित करतात. मात्र प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी प्लॉटमधील गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे काय ( Investment in Plot- Advantage and Disadvantage) समजून घेतले पाहिजेत. 

प्लॉटमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे (Advantages of Investing in Plot)

  1. जमीन ही मर्यादित प्रमाणात असते. यामुळे ती मौल्यवान प्रॉपर्टी ठरते. तिची नव्याने निर्मिती करता येत नसल्याने उपलब्ध असणाऱ्या प्लॉट्सना कालांतराने मागणी वाढू शकते आणि किंमतही वाढण्याची शक्यता असते.
  2. आपण खरेदी केली असेल अशा ठिकाणी एखादा मोठा प्रोजेक्ट सुरू होत असल्यास आजुबाजूच्या जमिनींच्या किमतींना चांगला भाव मिळतो. 
  3. प्लॉट खरेदीचा आणखी एक फायदा असा कि, आपल्याला ताबा मिळण्यासाठी थांबून राहावे लागत नाही. व्यवहार केल्यावर आपल्याला काही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जमीन ताब्यात मिळते.
  4. आपण जेव्हा गुंतवणूक म्हणून फ्लॅट खरेदी करतो तेव्हा आपल्याला मेंटेनन्स खर्चाचा विचार करावा लागतो. मात्र प्लॉटमधील खरेदीचा आणखी एक फायदा असा कि याचा देखभाल खर्चाचा (मेंटेनन्स चार्ज) फारसा प्रश्न नसतो. 
  5. तुम्हाला कोणतेही कर्ज न काढता सदनिका घ्यायची असेल तर अनेकदा ते अशक्यप्राय वाटते. मात्र एखाद्या गुंठयाचा भूखंड हा सहज खरेदी करता येतो. फ्लॅटच्या 10 टक्के रकमेतही प्लॉट खरेदी करता येतो. 

प्लॉटमध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे  (Disadvantage of Investing in Plot) 

  1. सदानिकेत गुंतवणूक करतो तेव्हा भविष्यात वाढलेल्या किमतीसह विक्री करण्याबरोबरच भाड्याने प्रॉपर्टी देऊनही नियमित उत्पन्न मिळवता येते. पण प्लॉटमधील गुंतवणुकीतून अशी संधी मिळत नाही.
  2. तुम्ही एकदा प्लॉटमध्ये गुंतवणूक केल्यावर ही गुंतवणूक गरज असेल तेव्हा लगेच मोकळी करून पैसे उभे करणे कठीण असते.
  3. जमिनीमध्ये गुंतवणूक कर्ज घेऊन करायची असेल तर त्यासाठी इथे समस्या येऊ शकतात, बँका तुम्ही भूखंड घेतलात आणि त्यावर मालमत्ता बांधण्याची योजना असेल अशा स्थितीतच कर्ज देण्यास उत्सुक असतात. त्यामुळे फक्त भूखंड खरेदीचा विचार करत असाल तर यासाठी कर्ज मिळवणे तुम्हाला अवघड ठरू शकते.
  4. कित्येक जण गुंतवणुकीचा विचार करताना कर सवलत किंवा कर बचत (Tax Benifits) मिळू शकेल का याचा विचार करतात. मात्र जमिनीत गुंतवणूक केल्यास कर लाभ मिळत नाहीत. 
  5. जमिनीबाबत अतिक्रमण होणे आणि त्याबाबत कायदेशीर समस्या निर्माण होऊन त्यात पैसा खर्च होणे, अशा गोष्टीदेखील अनेकदा घडतात.
  6. काहीवेळा तुम्हा खरेदी केलेली जमीन सरकारद्वारे सक्तीने अधिग्रहीत केला जाऊ शकतो. याचा मोबदला दिला  जातो पण तो तुम्हाला अपेक्षित मिळेल याची खात्री देता येत नाही.
  7. गुंतवणूक करताना तो एन.ए प्लॉट नसेल तर ते करुन घेणे खर्चिक ठरते. यासाठी तलाठी आणि तहसिल कार्यालयात जावे लागते. 

    जमिनीतील गुंतवणुकीचे लाभ आहेत तसेच  तोटेही आहेत. आपण गुंतवणूक करत असलेली जमीन कुठे आहे? आपली आर्थिक क्षमता काय आहे? भविष्यातल्या  आपल्या आर्थिक गरजा काय आहेत, अशा बाबींचा सरासर विचार करूनच  प्लॉटमधील गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा.