Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FPO च्या पहिल्याच दिवशी अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले, दोघांना लोअर सर्किट

Adani FPO

Image Source : www.arabianbusiness.com

Sensex Opening Bell: शुक्रवारी शेअर बाजार उघडताच देशांतर्गत शेअर बाजार कोसळलाच पण गुंतवणूकदारांच्या नजरा प्रामुख्याने अदानी शेअर्सच्या ग्रुपवर होत्या. आज अदानींच्या FPO चा पहिला दिवस होता.

सुरुवातीच्या व्यवहारातच सेन्सेक्स जवळपास 647.78 अंकांनी घसरला आहे. बाजाराच्या मध्यंतराच्या  वेळेत तो 58,557.28 अंकांवर व्यवहार करताना दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टीही 148 अंकांनी घसरून 17743.95 अंकांवर पोहोचला आहे. बाजारातील अदानी समूहाच्या शेअर्समध्ये भारतीची घसरण दिसून येत आहे. अदानी समूहाचे समभाग 16 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. दुसरीकडे टाटा मोटर्सचे शेअर्स सहा टक्क्यांनी वधारले आहेत. तत्पूर्वी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स 38 अंकांनी घसरून 60166 वर, निफ्टी 15 अंकांनी 17877 वर आणि बँक निफ्टी 265 अंकांनी घसरून 41382 वर बंद झाला. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी वधारून 81.52 वर पोहोचला.

शुक्रवारी सकाळी सलग दुसऱ्या सत्रात अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग मोठ्या घसरणीसह उघडले. बाजार उघडताच अदानी समूहाचे शेअर्स १९ टक्क्यांनी घसरले. यूएसस्थित हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाच्या समभागांची कमी केल्याने अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग सलग दुसऱ्या दिवशीही उलथापालथ झाले आहेत, ज्यामुळे समभागांच्या 85 टक्के जादा मूल्यांकनापासून कॉर्पोरेट गव्हर्नन्सपर्यंत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Adani

अदानी ग्रुपचे शेअर्स  इतके  कोसळले 

अदानी ट्रान्समिशनचा स्टॉक उघडताच 19 टक्क्यांनी घसरला. बुधवारी शेअर 2517 रुपयांवर बंद झाला होता, जो बाजार उघडल्यानंतर 482 रुपयांपर्यंत खाली घसरला. सध्या हा शेअर 13.22टक्क्यांच्या घसरणीसह 2177 रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी टोटल गॅसच्या स्टॉकमध्येही मोठी घट झाली आहे. शेअर 3660 रुपयांच्या शेवटच्या बंदवरून 700 रुपयांपर्यंत म्हणजे 19 टक्क्यांनी घसरून 2963 रुपयांवर आला. सध्या शेअर 13.66 टक्क्यांच्या घसरणीसह 3147 रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 1857 रुपयांच्या आधीच्या बंद पातळीवरून 1564 रुपयांवर 15.77 टक्क्यांनी म्हणजे 293 रुपये प्रति शेअर घसरला. सध्या हा शेअर 7.74 टक्क्यांच्या घसरणीसह 1714 रुपयांवर व्यवहार करत आहे.

या समभागांमध्ये लोअर सर्किट

अदानी समूहाच्या इतर समभागांमध्ये अदानी पॉवर आणि अदानी विल्मार हेही 5 टक्क्यांनी घसरले असून दोन्ही समभाग लोअर सर्किटमध्ये आहेत. बुधवारी 713 रुपयांवर बंद झालेला अदानी पोर्ट्सचा शेअर उघडताच 675 रुपयांपर्यंत घसरला, सध्या हा शेअर 2.63 टक्क्यांनी घसरून 695 रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी समूहाचे इतर समभाग NDTV 5 टक्के, अंबुजा सिमेंट 7.63 टक्के आणि ACC 6.09 टक्क्यांनी घसरले आहेत.अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ आजपासून सुरू होत आहे. इतिहासातील हा सर्वात मोठा एफपीओ आहे, या एफपीओची किंमत 20 हजार कोटी रुपये आहे. हा एफपीओ 31  जानेवारीपर्यंत चालेल. या FPO ची किंमत 3112-3276 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठी तेजी 

दुसरीकडे, तिमाही निकालानंतर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. या समभागात सुमारे 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये कमजोरी दिसून येत आहे. शुक्रवारी बजाज फायनान्स, वेदांत, ग्लेनमार्क फार्मा आणि आदित्य बिर्ला सन लाइफ या कंपन्यांचे निकाल येतील.