अदानी समूहाने म्हटले आहे की, आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की प्रवर्तकांकडून अंबुजा किंवा एसीसीचे कोणतेही शेअर्स तारण ठेवण्यात आलेले नाहीत. बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर या अफवा पसरवल्या जात असल्याचे समूहाने स्पष्ट केले आहे. गौतम अदानी यांनी FPO रद्द करण्याबाबत गुंतवणूकदारांशी संवाद साधला.
अदानी समूहाने याविषयी म्हटले आहे की, FPO रद्द करणे आणि कंपनीच्या शेअर्सच्या किमतींमध्ये प्रचंड अस्थिरता हे सर्व सुरू आहे. यादरम्यान आमच्याकडे विविध स्रोतांकडून काही अहवाल प्राप्त झाले आहेत. प्रवर्तकांनी आमच्या उपकंपन्या अंबुजा आणि ACC च्या अधिग्रहणासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी शेअर्स तारण ठेवल्याचा दावा केला गेला आहे.
यावर बाजारातील चढ-उतार दरम्यान या अफवा पसरवल्या जात असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. अदानी समूहाने असेही म्हटले आहे की, जेथे विक्रीचे प्रेशर आहे तिथे टॉप-अप ट्रिगर पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत समूहाने स्पष्ट केलय की, प्रवर्तकांनी अंबुजा किंवा ACC चे कोणतेही शेअर्स तारण ठेवलेले नाहीत. याविषयी समूहाने आणखी असे म्हटले आहे की कंपनीच्या प्रवर्तकांनी केवळ विल्हेवाट न लावलेले हमीपत्र दिले आहे आणि त्यानुसार अंबुजा आणि ACC च्या शेअर्सचे कोणतेही टॉप-अप किंवा कॅश टॉप-अप प्रदान करण्याची आवश्यकता नाही. एएननआयने ट्विटद्वारे याविषयीची माहिती दिली आहे.
अंबुजा आणि एसीसीचे आजचे भाव
अंबुजा सीमेंट 2 फेब्रुवारी रोजी 352.55 रुपयांवर बंद झाला. आज दिवसभरात 5.52 टक्क्यांची वाढ झाली. 18.45 रुपये इतकी ही वाढ आहे. एसीसीने आज 0.28 टक्क्यांची घट नोंदवली. 1841,25 रुपयांवर बंद झाला आहे.