अब्जाधीश गौतम अदानी आपल्या कॉर्पोरेट करिअरमधील सर्वात बिकट परिस्थितीशी संघर्ष करताना दिसत आहेत. 24 जानेवारी रोजी हिंडनबर्ग संशोधन अहवालात अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप झाल्यापासून बाजार मूल्य 108 अब्ज डॉलरने कमी झाले आहे, असे ब्लूमबर्ग रिपोर्टने स्पष्ट केले आहे.
24 जानेवारीला Hindenburg अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांनी त्यांचे एकत्रित बाजारमूल्य जवळपास निम्मे इतके गमावले आहे. अदानी एंटरप्रायझेस ज्याचे वर्णन अदानीच्या व्यवसायांचे एक इनक्यूबेटर म्हणून केले जाते. तिथे बाजार भांडवलात 26 अब्ज डॉलर घट झाली आहे.अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स गुरुवारी 27 टक्क्यांनी घसरले. मार्च 2022 नंतरच्या सर्वात कमी पातळीवर ते बंद झाले.अदानी टोटल गॅसच्या 10 टक्के तोट्यासह इतर समूह कंपन्यांनीही आणखी नुकसान सोसले आहे. अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशन तर अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जवळपास 7 टक्के इतकी घट झाली.
स्टेट बँकेलाही फटका बसला
या गोंधळामुळे केवळ अदानी समूहाच्या शेअर्सनाच नाही तर कंपन्यांना कर्ज देणाऱ्या बँकांनाही फटका बसला आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया 11 टक्क्यांनी घसरली आहे. ब्लूमबर्गने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 27 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान भारताच्या शेअर बाजारातून निव्वळ 2 अब्ज डॉलर काढले. "अदानी-संबंधित हेडिंग उच्च पातळीवरील नकारात्मकता निर्माण करत आहेत, ज्यामुळे भारतीय शेअर्ससाठी गुंतवणूकदारांची मागणी कमी होऊ शकते," ब्लूमबर्गने झ्युरिच-आधारित GAM इन्व्हेस्टमेंट्सचे फंड मॅनेजर जियान शी कोर्टेसी यांचे हे म्हणणे सांगितले आहे. ते 80 अब्ज डॉलर पेक्षा जास्त मालमत्तेवर देखरेख करतात. "आम्हाला या प्रकरणी संपूर्ण भारतीय शेअर बाजार खाली खेचताना दिसत नाही, परंतु आम्हाला वाटते की यामुळे चीनसारख्या इतर आशियाई बाजारपेठांमध्ये भारताची कामगिरी कमी होऊ शकते," असे ते पुढे म्हणाले.
ब्लूमबर्गने असेही वृत्त दिले आहे की "समूहाच्या आर्थिक आरोग्याबाबत नकारात्मक बातम्यांमुळे" किमतीत घट झाल्यामुळे सिटीग्रुपच्या संपत्ती युनिटने मार्जिन कर्जासाठी तारण म्हणून अदानी कंपन्यांकडून जारी केलेले सिक्युरिटीज स्वीकारणे बंद केले आहे. क्रेडिट सुईसच्या खाजगी बँकिंग युनिटने देखील रोख्यांसाठी असाच बदल केला होता. मिझुहो फायनान्शियल ग्रुप इंक.च्या सिक्युरिटीज डिव्हिजनचे अदानी ग्रुपशी पूर्वीचे व्यवहार होते आणि ते समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांची तपासणी करत आहेत, असे युनिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी योशिरो हमामोटो यांनी गुरुवारी टोकियो येथे पत्रकारांना सांगितले.
अदानी यांनी हे आरोप फेटाळून लावले
अदानी यांच्या कंपनीने दाव्यांचे खंडन केले आहे आणि ते स्वतः गुरुवारी एका व्हिडिओमध्ये म्हणाले की रद्द केलेल्या FPO चा कोणताही परिणाम होणार नाही. परंतु, यानंतरही विक्री कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.