हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर Dow Jones ने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अदानी समूहाने आपला एफपीओ मागे घेण्याचाही निर्णय घेतलेला आहे. अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट या तीन शेअर्सचा ASM (अतिरिक्त मॉनिटरिंग मेजर) यादीत समावेश झाल्यानंतर या समूहाला अमेरिकन बाजारातूनही मोठा धक्का बसला आहे. आता डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्सने त्याच्या निर्देशांकातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. यूएस मार्केटच्या निर्देशांकाच्या घोषणेमध्ये असे म्हटले आहे की 7 फेब्रुवारी 2023 पासून कंपनीचे शेअर्स डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकले जातील.
निर्देशांकाच्या वतीने घोषणा करताना अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी उलथापालथ झाल्याच्या वृत्तानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीचे शेअर्स 7 फेब्रुवारी 2023 पासून म्हणजेच पुढील मंगळवारपासून निर्देशांकातून वगळले जातील. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर डाऊ जोन्सने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अदानी समूहाने आपला एफपीओ मागे घेण्याचा निर्णयही घेतला आहे. या घडामोडींमुळे अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स जे रु.3442 प्रति समभागाने व्यवहार करत होते ते प्रति शेअर 1586 रुपयांवर वर आले आहेत. कंपनीचे शेअर्स 55 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. शुक्रवारीही देशांतर्गत शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
Dow Jones काय आहे?
डाऊ जोन्स हा अमेरिकन शेअर बाजार आहे. डाऊ जोन्स अंतर्गत 30 मोठ्या कंपन्या सूचीबद्ध आहेत. आता 7 फेब्रुवारीपासून अदानी शेअर्स Dow Jones इंडेक्सच्या बाहेर पडणार आहेत. गौतम अदानी यांना रोज नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. Hindenburg च्या अहवालानंतर त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.