कोरोनानंतर भारतीय बाजाराने उसळी घेतली असून येत्या काळात वस्तू आणि सेवांचा खप अधिक वाढण्याची शक्यता आहेत. मात्र, ग्राहकांना आपल्या उत्पादन आणि सेवांकडे आकर्षित करण्यासाठी जाहिरात महत्त्वाची ठरते. चालू वर्षात भारतामध्ये जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केली जाणार असल्याचे अहवालातून समोर आले आहे. डिजिटल अॅडव्हरटाइजिंग यामध्ये लिडर ठरणार असून प्रिंट, टीव्हीवरील जाहिरांवरील खर्चातही कंपन्या वाढ करणार आहेत.
भारतामध्ये जाहिरातींवरील खर्च 15.5% वाढून ₹1,46,450 कोटी रुपये इतका होऊ शकतो. गेल्या वर्षी जाहिरातींवर एकूण 1,26,818 रुपये खर्च करण्यात आले होते. GroupM कंपनीने याबाबतच अभ्यास करुन अहवाल सादर केला आहे. मागील काही वर्षात प्रिंट आणि टीव्ही जाहिरातींवरील खर्च रोडावला होता. तर डिजिटल जाहिरांतींचे प्रमाण वाढले होते. मात्र, आता चालू वर्षात यामध्ये या पारंपरिक माध्यमांमधील जाहिरातीही वाढणार आहेत.
या क्षेत्रातील कंपन्यांकडून जाहिरात खर्चात वाढ ( Top ad spending sectors)
टेलिकॉम, रिटेल, मीडिया, गेमिंग, फिनटेक कंपन्या, ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रातील कंपन्यांचा कल जास्त जाहिरात करण्यावर असल्याचा अंदाज अहवालात वर्तवला आहे. एकूण जाहिरातीवरील खर्चापैकी 71% वाटा डिजिटल माध्यमे व्यापतील, तर टीव्हीचा वाटा 18 टक्के असेल, असे अहवालात म्हटले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत डिजिटल जाहिरातींमध्ये 20% वाढ होऊन एकूण महसूल 82 हजार कोटींपेक्षा जास्त होऊ शकतो, असे भाकीत अहवालात वर्तवले आहे.
भारताची बाजारपेठ आंतरराष्ट्रीय कंपन्यांना कायमच आकर्षित करत आली आहे. ग्राहकोपयोगी उत्पादने ते आलिशान गाड्यांच्या मार्केटमध्ये परदेशी कंपन्यांनी जम बसवला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर या कंपन्यांकडून करण्यात येत आहे.
विविध माध्यमांवर जाहिराती करण्यासाठी अॅडव्हर्टायजिंग काऊंन्सिल ऑफ इंडिया (ASCI) नियमावली जारी केली आहे. इन्फ्लुएंसरद्वारे केल्या जाहिरातीवरही सरकारने नियंत्रण आणले आहे. एखाद्या ब्रँडची जाहिरात करताना किती पैसे घेतले किंवा काय मोफत मिळाले हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला जाहिरात करताना सांगावे लागणार आहे.
1)जाहिरातींमध्ये देण्यात आलेला डिस्क्लेमर ठळक अक्षरात असावा.
2)डिस्क्लेमरची एक ओळ किमान चार सेकंद स्क्रिनवर ठेवावी.
3)हेडिंग साधी सोपी आणि सुटसुटीत असावी
4)एकापेक्षा जास्त डिस्क्लेमर नसावे.
5)जास्तीत जास्त दोन ओळींमध्ये सूचना असावी. प्रत्येक ओळ चार सेकंद स्क्रिनवर राहायला हवी.
6)ऑडिओ जाहिराती किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींना हे नियम लागू असतील.
7)जाहिरातीमध्ये केलेला दावा उत्पादन आणि सेवेशी सुसंगत असावा. त्यामध्ये स्पष्टता असावी, अस्पष्ट माहिती असता कामा नये.
8)जाहिरात ज्या भाषेत आहे त्याच भाषेत डिस्क्लेमर लिहलेले असावे. दोन भाषांमध्ये जाहिरात असेल तर दोन्हीही भाषांमध्ये डिस्क्लेमर द्यावे.