टाटा स्कायने (Tata Sky) गेल्या जानेवारीत टाटा प्ले (Tata Play) म्हणून स्वतःचे रीब्रँडिंग (Rebranding) केले होते आणि त्याच्या एकत्रित पॅकेजेसमध्ये टेलिव्हिजन-कम-ओटीटी (ओव्हर-द-टॉप) ऑफरचा विस्तार केला होता. टाटा प्लेने आता त्यांच्या सेवेत तीन प्रादेशिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये मनोरमामॅक्स (Manorama Max), कूडे (Koode)आणि तरंग प्लसचा (Tarang Plus) समावेश आहे जे दर्शकांसाठी मल्याळम आणि ओडिया भाषा प्रोग्रामिंग उपलब्ध करून देतील.
Hoichoi, Disney+ Hotstar, ZEE5, Sony LIV, Voot Select, SunNxt, Hungama Play, Eros Now, ShemarooMe, Voot Kids, CuriosityStream, EPIC ON आणि DocuBay सारख्या सेवा टाटा प्लेवर आधीपासूनच उपलब्ध होत्या.
“प्रादेशिक भाषेतील मनोरंजनपर कार्यक्रमाला आता राष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त होत आहे. या सर्वात एक महत्त्वाचा घटक म्हणजे OTT प्लॅटफॉर्मचा वाढत असलेला वापर. मल्याळी आणि ओडिया भाषेतील करमणूकप्र कार्यक्रमांना अधिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी manoramaMAX, Koode आणि Tarang Plus सोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. येणाऱ्या काळात आम्ही Tata Play Binge वर विविध प्लॅटफॉर्म आणि ऍप्स सुविधा जोडणे सुरू ठेवणार आहोत" असे टाटा प्लेच्या मुख्य व्यावसायिक अधिकारी (Commercial Officer), पल्लवी पुरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
टाटा प्लेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हरित नागपाल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कंपनीला हे समजले आहे की बरेच लोक अजूनही टेलिव्हिजन सोबत OTT वरील कार्यक्रम देखील पाहत आहेत.आमची नवीन ब्रँड ओळख या कल्पनेशी सुसंगत आहे की आम्ही आता फक्त डीटीएच प्लेयर (DTH Player) नाही तर थेट टेलिव्हिजन आणि ओटीटी सेवांचे वितरक आहोत.