Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Traffic Rules: आजपासून वाहतुकीचा नवा नियम लागू, दुर्लक्ष करणाऱ्याला भरावा लागेल दंड

Traffic rules

Image Source : www.freepressjournal.in

Traffic Rules: वाहतूक नियमांचे पालन करत आहात म्हणजेच तुम्ही सुरक्षित जीवन जगत आहात असे समजले जाते. तुमचे अनमोल आयुष्य लक्षात घेऊन असाच एक नियम आजपासून (1 नोव्हेंबर) लागू होणार आहे, ज्याचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

Traffic Rules: वाहन चालवताना तुम्हाला वाहतुकीचे विविध नियम पाळावे लागतात (Follow Traffic Rules). वाहतूक नियमांचे पालन केल्याने तुमच्यावर बसणारी चालानही टाळता येते आणि तुमचे जीवनही सुरक्षित होते. असाच एक नियम आजपासून (1 नोव्हेंबर) पासून लागू होणार आहे, ज्याचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. हा नियम सीट बेल्टशी संबंधित आहे. 1 नोव्हेंबरपासून मुंबईत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला सीट बेल्ट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिल्ली-एनसीआरसह अनेक शहरांमध्ये या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

टाटा सन्सचे (Tata Sons)माजी चेअरमन सायरस मिस्त्री  (54) यांचा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात 4 सप्टेंबर रोजी झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या सीटवर बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता.


दिल्लीत नियमाचे पालन न केल्यास…

रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी, दिल्ली वाहतूक पोलीस कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्याबद्दल 1,000 रुपये दंड आकारत आहे. या संदर्भात पोलिस सोशल मीडियापासून अनेक ठिकाणी मोहीमही राबवत आहेत. आत्तापर्यंत सीट बेल्ट न लावणाऱ्यांसाठीही मोठ्या प्रमाणात चलन जारी करण्यात आले आहे.

सीट बेल्ट अलार्म अनिवार्य 

मागील महिन्यात, रस्ते वाहतूक मंत्रालयाने कार उत्पादकांसाठी मागील सीट बेल्ट अलार्म अनिवार्य करण्यासाठी मसुदा नियम जारी केला. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर समोरच्या सीटप्रमाणेच मागील सीटसाठीही सीट बेल्ट अलार्म लावणे सक्तीचे केले जाईल (Seat belt alarm mandatory).