Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

संघर्ष करणारा उद्योजक हरपला! सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन, कॉर्पोरेट क्षेत्र हळहळले

Cyrus Mistry Died

Crus Mistry Died: देशातील बड्या उद्योगांपैकी एक असलेल्या टाटा समूहातील सर्वात मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार असलेल्या (Single Largest Stake Holder) शापूरजी पालनजी मिस्त्री कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सायरस मिस्त्री यांचे आज रविवारी अपघाती निधन झाले.

Cyrus Mistry Killed in Car Accident Today: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (वय 54) यांचे आज रविवारी 4 सप्टेंबर 2022 रोजी अपघाती निधन झाले. अहमदाबादहून मुंबईकडे येत असताना पालघरनजीक चारोटी येथे मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला. यात त्यांच्यासह एकाचा जागीच मृत्यू झाला. इतर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. दरम्यान, सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने कॉर्पोरेट क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. 

जून महिन्यात सायरस यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांचे निधन झाले होते. आज सायरस मिस्त्री यांच्या अपघाताने मिस्त्री कुटुंबांसाठी तीन महिन्यांतील दुसरा मोठा आघात आहे. सायरस यांच्या पश्चात पत्नी रोहिका छागला आणि दोन मुले फिरोज व झहान मिस्त्री असा परिवार आहे. सायरस यांचे मोठे भाऊ शापूर मिस्त्री हे शापूरजी पालनजी समूहाचे अध्यक्ष आहेत. (Shapoorji Pallonji Group)

मिस्त्री समूहाची टाटा समूहातील 18.4% हिस्सेदारी 

मिस्त्री यांच्या दुर्देवी मृत्यूने कॉर्पोरेटमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे. सायरस  मिस्त्री हे डिसेंबर 2012 मध्ये टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष बनले होते. टाटा समूहाचे अध्यक्षपद भूषवणारे सायरस  मिस्त्री ही टाटा कुटुंबियांव्यतिरिक्त दुसरे व्यक्ती होते. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर सायरस  मिस्त्री  आणि टाटा समूहात न्यायालयीन लढाई सुरु होती. टाटा समूहात सुशासनाचा आग्रह धरणाऱ्या सायरस  मिस्त्री यांनी टाटा समूहाविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत दाद मागितली.  मिस्त्री कुटुंबिय (शापूरजी पालनजी) हे टाटा समूहातील 18.4% हिस्सेदारीसह सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत.

मिस्त्री यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच उद्योगजगतातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. टाटा समहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, आनंद महिंद्रा, हर्ष गोयंका यांनी आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, पियूष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. 

सायरस मिस्त्री यांच्या बद्दलच्या महत्वाच्या गोष्टी

  • सायरस मिस्त्री शापूरजी पालनजी मिस्त्री कुटुंबाचे एक सदस्य,  या कुटुंबाकडे टाटा समूहातील 18.4% हिस्सेदारीसह  
  • शापूरजी पालनजी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक, नवीन संसद भवनाचे कंत्राट शापूरजी पालनजीकडे
  • टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष, सर्वात तरुण अध्यक्ष बनण्याचा बहुमान
  • वयाच्या 26 व्या वर्षी शापूरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनले
  • मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी आर्यलंडमध्ये झाला, त्यांचे आयरिश नागरिकत्व होते
  • मितभाषी आणि शब्द पाळणारे उद्योजक म्हणून सायरस मिस्त्री यांची कॉर्पोरेटमध्ये ओळख
  • सायरस यांनी शापूरजी पालनजी समूहाला बांधकाम उद्योगात नव्या उंचीवर नेले
  • अश्व शर्यतींची सायरस मिस्त्री यांना आवड होते, ते पुण्यातील फार्महाऊसवर नेहमी जात असत. 
  • अध्यक्षपदी असतानाच सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहात सुशासनाचा आग्रह धरला होता. यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
  • अध्यक्षपदावरुन झालेल्या तडकाफडकी हकालपट्टीला सायरस मिस्त्री यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
  • सायरस मिस्त्री आणि टाटा सन्स यांच्यामधील खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित होता.