Second Hand Vehicles Rules: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्यावतीने सेंकडहॅंड वाहनांच्या खरेदी-विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी नियमात मोठा बदल केला आहे. जसे की, जुनी कार खरेदी करताना नोंदणी हस्तांतरण, कार मालकाची माहिती आणि थर्ड पार्टीचे नुकसान यांसारख्या अनेक गोष्टी असतात. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. यामुळे कार कंपन्या, डीलर्सप्रमाणेच सामान्य लोकांनादेखील फायदा होणार आहे.
नियमांतील बदल
नवीन नियमांनुसार, आता आरटीओमधील नोंदणीकृत डीलर्स हे कंपनीची कार किंवा वाहनांची खरेदी-विक्री करू शकतील. यामुळे सेकंड हँड वाहनांच्या विक्री आणि खरेदीमध्ये पारदर्शकता येईल. आता डीलर्सना पुनर्विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक नोंदणीकृत वाहनाची माहिती अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. डीलर्सना आता नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र, एनओसी आणि ताब्यात असलेल्या वाहनांच्या वाहन हस्तांतरणासाठी थेट अर्ज करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
सर्वसामान्यांना होणार फायदा
वाहतूक तज्ज्ञ गुरुमतित सिंह तनेजा यांनी सांगितलेकी, कार विकताना डीलर्स कोऱ्या विक्री कागदांवर स्वाक्षरी करतात. मात्र कार विक्री होण्यास थोडा कालावधी लागतो. या कालावधीमध्ये कार कोण वापरतो, हे कार मालकाला कळत नाही. त्यामुळे नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, डीलरला प्रथम कार त्याच्या नावावरऑनलाइन नोंदणीकृत करावी लागेल. त्यानंतरच तो त्याची विक्री करू शकेल. अशा स्थितीतकार विकल्यानंतर मालकावर कोणतीही जबाबदारी राहणार नाही.