रिअल इस्टेट क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून महागड्या आणि लग्झरी प्रॉपर्टी खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच फार्मा कंपनी मायक्रो लॅब्स लिमिटेडचे अध्यक्ष दिलीप सुराणा (Dilip Surana, Chairman of Pharma Company Micro Labs Limited) यांनी एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. सध्या याच बंगल्याची चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत आहे.
दिलीप सुराणा यांनी खरेदी केलेली ही प्रॉपर्टी कर्नाटकाच्या राजधानीत म्हणजे बंगळुरुमध्ये आहे. या प्रॉपर्टीसाठी 3.36 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty) भरली. या रकमेत मुंबईसारख्या शहरात राहणारी व्यक्ती 1 बीएचकेचे किमान 2 फ्लॅट घेऊ शकली असती. तर उपनगरामध्ये राहणारा माणूस किमान 3-4 फ्लॅट घेऊ शकला असता. स्टॅम्प ड्युटीच्या या रकमेवरून या प्रॉपर्टीची डील नेमकी किती रुपयांना झाली असेल. हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
प्रॉपर्टी कुठे आणि किती आहे?
दिलीप सुराणा यांनी खरेदी केलेली प्रॉपर्टी बंगळुरुमधील फेयर फील्ड लेआउट (Fair Field Layout) या परिसरात आहे. या परिसराला सुरुवातीपासून 'रेसकोर्स रोड' या नावाने ओळखले जाते. त्याठिकाणी एका प्लॉटच्या एरियामध्ये हा बंगला बांधण्यात आला आहे. प्रॉपर्टीमधील डीलनुसार हा प्लॉट 12,043.22 स्क्वेअर फुटांचा असून यातील बंगल्याचे बांधकाम हे 8,373.99 स्क्वेअर फुटामध्ये केलेले आहे.
आलिशान घराच्या डीलसाठी इतके दिले पैसे?
बंगळुरुमधील ही प्रॉपर्टी त्यांनी जीजी राजेंद्र कुमार, त्यांची पत्नी साधना राजेंद्र कुमार आणि मनू गौतम यांच्याकडून खरेदी केली आहे. विक्री कराराच्या कागदपत्रानुसार सुराणा यांनी ही प्रॉपर्टी 66 करोड रुपयांना खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीवर त्यांनी थोडीथोडकी नाही, तर 3.36 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. या रकमेत सर्वसामान्यांना किमान 2-3 घरे विकत घेता आली असती.
मायक्रो लॅब्स लिमिटेडबद्दल जाणून घ्या
मायक्रो लॅब्स लिमिटेड कंपनीची स्थापना दिलीप सुराणा यांचे वडील जी. सी. सुराणा (G. C. Surana) यांनी 1973 मध्ये चेन्नई येथे केली होती. सध्या या कंपनीचे मुख्य ऑफिस बंगळुरुमध्ये आहे. ही कंपनी कोविड महामारीच्या दरम्यान चांगलीच चर्चेत होती. या कंपनीचा पॅरासिटामोल ब्रॅण्ड असलेली डोलो 650 (Dolo 650) ही टॅबलेट त्यादरम्यान प्रचंड विकली गेली होती.
Source: economictimes.indiatimes.com
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            