Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Notes: 2000 रुपयांची नोट तुम्हाला रातोरात लखपती बनवू शकते! जाणून घ्या सविस्तर

2000 Notes

भारतात जुने दुर्मिळ चलन, नाणी, नोटा यांचा संग्रह करण्याचा अनेकांना छंद आहे. तसेच नोटांचा नंबर काहीसा खास असेल तर त्या नोटा देखील महाग किमतीत विकल्या जातात. अशाच खास चलनाची खरेदी विक्री करणाऱ्या काही वेबसाइट्सवर, 2000 ची एक नोट 2 लाखांपर्यंत विकली जात आहे. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमधून बदलून मिळणार आहेत किंवा त्यांच्या बँक खात्यात जमा करता येणार आहेत.

2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबाटल केल्या जाणार असल्या अटारी त्याची चलन म्हणून कायदेशीर निविदा तशीच कायम राहणार आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरपूर्वी नागरिकांनी त्यांच्या नोटा जमा केल्या तरी चालणार आहेत. तुमच्याकडे देखील 2000 रुपयांच्या नोटा आहेत का?

नोटा बदली करण्यापूर्वी किंवा बँकेत भरणा करण्यापूर्वी तुमच्याकडे असलेल्या या नोटा एकदा चांगल्या तपासून घ्या. कारण काही स्पेशल नोटा तुम्हाला लखपती देखील बनवू शकतात. काय म्हणता? विश्वास बसत नाहीये? 2000 रुपयांच्या नोटा देऊन कुणाला लाखो रुपये मिळतील असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा लेख वाचाच.

दुर्मिळ चलनाची विक्री 

भारतात जुने दुर्मिळ चलन, नाणी, नोटा यांचा संग्रह करण्याचा अनेकांना छंद आहे. तसेच नोटांचा नंबर काहीसा खास असेल तर त्या नोटा देखील महाग किमतीत विकल्या जातात. अशाच खास चलनाची खरेदी विक्री करणाऱ्या काही वेबसाइट्सवर, 2000 ची एक नोट 2 लाखांपर्यंत विकली जात आहे. याचे कारण म्हणजे या नोटेवरचा नंबर! लकी समजला जाणारा ‘786’ हा नंबर असलेली ही नोट तब्बल 2 लाखांना विकली जात आहे.

2000 च्या नोटा चलनातून काढल्यानंतर ते एक ‘दुर्मिळ चलन’ बनणार आहे. त्यामुळे अशा स्पेशल नोटा बँकेत जमा करण्याऐवजी चलन संग्रह करणाऱ्या व्यक्तींना विकून तुम्ही चांगली कमाई करू शकता. आहे की नाही ही फायद्याची गोष्ट?

म्हणूनच जेव्हा तुम्ही  बँकांमध्ये 2000 च्या नोटा जमा करायचा विचार कराल,त्यापूर्वी तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही नोटांवर दुर्मिळ असा अनुक्रमांक तर नाही ना हे तपासून बघा, जसे की:

1. लकी क्रमांक 786

2. मिरर इमेज क्रमांक उदा. (123454321)

3. फॅन्सी क्रमांक उदा. 1 दशलक्ष (1000000), 317317 इत्यादी

4. समान संख्या असलेले क्रमांक उदा. (1111111)

5. उतरत्या किंवा चढत्या क्रमांकाच्या नोटा उदा. (12345 किंवा 54321)

ही काही निवडक उदाहरणे आहेत. तुमच्याकडे देखील अशा हटके क्रमांकाच्या नोटा असतील तर तुम्ही त्या eBay किंवा Coin Bazaar सारख्या वेबसाइटवर विकू शकता आणि चांगला मोबदला मिळवू शकता.