Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reliance Capital Auction: अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलसाठी टोरेंट समुहाची 8640 कोटींची बोली!

Reliance Capital Auction

Reliance Capital Auction: रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीसाठी हिंदुजा ग्रुपने बुधवारी (दि. 21 डिसेंबर) सर्वाधिक 8,600 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यावर आता अहमदाबादमधील टोरेंट समुहाने 8640 कोटी रुपयांची बोली लावली.

कर्जात बुडालेल्या अनिल अंबानी यांच्या मालकीची असलेली रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या लिलावात बुधवारी (दि. 21 डिसेंबर) हिंदुजा ग्रुपने (Hinduja Group) 8600 कोटी रुपयांची बोली लावून बाजी मारली होती. पण त्यानंतर आता अहमदाबाद येथील टोरेंट समुहाने (Torrent Group) ही रिलायन्स कॅपिटलसाठी 8640 कोटी रुपयांची बोली लावली. यामुळे हिंदुजा ग्रुपची बोली दुसऱ्या क्रमांकावर गेली असून पहिल्या क्रमांका टोरेंट समूह आला आहे.

बुधवारी सुरू झालेल्या या लिलावात हिंदुजा ग्रुपने सर्वाधिक 8600 कोटी रुपयांची बोली लावून या लिलाव प्रक्रियेत पहिला क्रमांक पटकावला होता. पण आज (गुरूवारी) टोरेंट समुहाने रिलायन्स कॅपिटलसाठी 8600 कोटी रुपयांची बोली लावून पहिले स्थान पटकावले आहे.

रिलायन्स कॅपिटलच्या या लिलावासाठी (Reliance Capital Auction) कमिटी ऑफ क्रेडिटर्सने (Committee of Creditors) पहिल्या राऊंडसाठी 6500 कोटी रुपयांची बोली जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला ही बोली अनुक्रमे 7,500 कोटी आणि 8,500 कोटी रुपये झाली. सुरूवातीच्या फेरीनंतर या लिलावामध्ये बोली 250 आणि 500 कोटींनी लावली जात होती. कॉस्मिया पिरामल कंपनी या लिलाव प्रक्रियेतून अगोदरच बाहेर पडली होती. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) आदेशानुसार, कर्जदारांना 31 जानेवारी, 2023 पर्यंत रिलायन्स कॅपिटलची रिझॉल्यूशन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

या लिलाव प्रक्रियेत टोरेंट ग्रुपने बाजी मारल्यास या ग्रुपला फायनान्शिअल सर्व्हिस सेक्टरमध्ये फायदा होऊ शकतो. रिलायन्स कॅपिटलसोबत टोरेंट ग्रुपला रिलायन्स जनरल इन्शुरन्स (Reliance General Insurance) कंपनीत 100 टक्के हिस्सा मिळणार आहे. त्याचबरोबर रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स (Reliance Nippon Life Insurance)मध्ये इतर मालमत्तांसह 51 टक्के हिस्सा मिळणार आहेत.