Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केटमधील यशस्वी गुंतवणुकीसाठी अष्टमंत्र!

शेअर मार्केटमधील यशस्वी गुंतवणुकीसाठी अष्टमंत्र!

Investment in Share Market : शेअर्समधील गुंतवणुकीला ‘कला’ आणि ‘शास्त्र’ असं म्हटले जाते. ‘ कला’ या अर्थी की विकत घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याची कला आणि शास्त्र म्हणजे विकत घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याचा निर्णय हा शेअर मार्केट तसेच आर्थिक घडामोडीबाबत माहितीच्या विश्लेषणावर आधारित असला पाहिजे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी की नाही? हा अनेक सामान्य गुंतवणूकदारांच्या मनातील एक प्रश्न! शेअर्समधील गुंतवणूक (Investment in Share Market) म्हणजे सट्टा किंवा जुगारच असा ठाम विचार मनात घर करून राहिलेले अनेक गुंतवणूकदार आहेत. तसेच एका बाजूला  शेअर मार्केटद्वारे 3 ते 5 वर्षात दुप्पट तिप्पट पैसा कमावणारे मित्र त्यांना पाहायला मिळतात तर दुसरीकडे प्रचंड तोटा सहन करावे लागलेले मित्रही पहायला मिळतात. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे शेअर मार्केट मधील गुंतवणुकीविषयी प्रचंड संभ्रम! (Confusion about investment)

परंतु गुंतवणूक (Investment) जशी नियमित व्याज देणाऱ्या योजनांमध्ये करावी तशीच ती वृद्धी होणाऱ्या योजनांमध्ये करायला हवी. शेअर्समधील गुंतवणुकीबाबत काही नियम पाळले गेले तर अशी गुंतवणूक सट्टा किंवा जुगार न राहता वाढत्या महागाईला यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी एक प्रभावी साधन ठरेल. 

शेअर्समधील गुंतवणुकीला  ‘कला’ आणि ‘शास्त्र’ असं म्हटले जाते. ‘ कला’ या अर्थी की विकत घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याची कला आणि शास्त्र म्हणजे विकत घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याचा निर्णय हा शेअर मार्केट (Share Market) तसेच आर्थिक घडामोडीबाबत माहितीच्या विश्लेषणावर आधारित असला पाहिजे. 

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी खालील अष्टमंत्र लक्षात ठेवा

शेअर्सबद्दल आणि कंपनीबद्दल संपूर्ण माहिती घ्या!

प्रस्थापित आणि प्रसिद्ध कंपनी असेल तर गोष्ट निराळी. पण तुलनेने कंपनी नवी असेल तर खालील मुद्दे विचारात घ्या.

  • कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत? त्यांचा या क्षेत्रातील अनुभव किती आहे?
  • कंपनी चालवण्याची जबाबदारी कुणावर आहे? 
  • कंपनीचे उत्पादन किंवा सेवा यांना बाजारपेठेमध्ये किती मागणी आहे?
  • कंपनीचा डिव्हिडंड देण्याचा रेकॉर्ड कसा आहे?
  • शेअर मार्केट मध्ये त्या कंपनीच्या शेअर विषयी काय sentiments म्हणजे भावना आहेत?


मार्केटमध्ये योग्य वेळी प्रवेश करणं आणि बाहेर पडणं महत्त्वाचं असतं!

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याबाबत अनेक गुंतवणूकदारांना प्रचंड ( पण आततायी ) उत्साह आणि इच्छा असते. आणि इथेच एक चूक घडते... “शेअर मार्केटमध्ये प्रचंड तेजी”, असा मथळा वृत्तपत्रात वाचून किंवा टीव्हीवर ऐकून काही अतिउत्साही गुंतवणूकदार चढलेल्या भावात शेअर्स विकत घेतात. या उलट शेअर मार्केटमध्ये मंदी असताना म्हणजे शेअरच्या किमती तुलनेने खाली आलेल्या असताना शेअर्स विकत घ्या, अशी शिफारस केली असता “सध्या शेअर मार्केटमध्ये मंदीच सावट” असं वृत्तपत्रामध्ये वाचतोय आणि तुम्ही शेअर्स घ्या असा सल्ला काय देताय? असा प्रश्न विचारला जातो. पण खर म्हणजे मंदी असताना शेअर्स विकत घेणे आणि तेजी असताना ते विकणे हे तंत्र आत्मसात केल्यास फायदा होतो.

वेळोवेळी प्रॉफीट बुक करण्याची सवय लावून घ्या!

शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी शेअर्सची काळजी घेणारा (Care Taker) गुंतवणूकदार असून चालत नाही तर ते शेअर्स योग्य वेळी विकून नफा कमावणारा गुंतवणूकदार असला पाहिजे. अनेक गुंतवणूकदार आपल्याजवळील शेअर्स वर्षानुवर्षे तसेच ठेऊन देतात.. मधल्या काळात अनेकदा तेजी येऊनही जाते आणि त्यांनी विकत घेतलेल्या शेअर्सना चांगली किंमतही मिळू शकत असते, पण ते शेअर्स विकत नाहीत. अशा गुंतवणूकदारांना आपल्याजवळ खूप किंमतीचे शेअर्स आहेत याचा ( पोकळ ) अभिमान वाटतो. पण त्याचा काय उपयोग? 

8 ways to invest in share market

चांगल्या शेअर्सची निवड म्हत्त्वाची 

शेअर्सच्या भावामध्ये चढ उतार होऊ शकतात. त्यामुळे त्यामध्ये जोखीम असू शकते. याला उत्तर म्हणजे एक दोन कंपन्याच्या शेअर्स मध्ये पैसे न गुंतवता विविध क्षेत्रातील प्रत्येकी दोन ते तीन कंपन्याच्या उच्च गुणवत्ता असलेल्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवल्यास जोखीम कमी राहील. थोडक्यात गुंतवणुकीमध्ये वैविध्यता ठेवावे.

संयम बाळगा

शेअर्समधील गुंतवणूक दीर्घ काळासाठी असेल तर फायदेशीर ठरते. त्यामुळे अपेक्षित लाभ मिळण्यासाठी खूप धीर असावा लागतो. पैसे गुंतवल्यावर एखाद्या शेअर्सच्या किंमतीमध्ये लगेच घसरण झाली तर निराश किंवा panic होऊ नये.. शेअर्सच्या बाबतीत “धीरापोटी फळे रसाळ गोमटी” हेच तत्व लागू पडते.

शेअर्सच्या कामगिरीवर लक्ष ठेवा

भविष्यात मार्केट वर जाईल का खाली? हा प्रश्न कधीही कुणालाही विचारू नका. ते निश्चितपणे कुणालाच सांगता येत नाही. त्यामुळे या प्रश्नाच्या आधारे गुंतवणूक करण्याऐवजी शेअर्सची अंगभूत किंमत (Intrinsic Value) माहिती करून त्या आधारे शेअर्स विकत घ्या. 

शेअर्स कधी विकावेत याचा अंदाज घ्या

“मी हे घेतलेले शेअर्स आता विकू का हो?, असे इतरांना विचारत बसू नये. किती नफा झाला असता समाधान मिळेल याचे गणित ज्याचे त्याने ठरवावे आणि तो अपेक्षित नफा दिसताच शेअर्स विकून मोकळे व्हा. शेअरची किंमत अजून वाढेल, थोडा अजून थांबतो असे करू नका. लाभ आणि लोभ यामधील पुसट रेषा नेहमी लक्षात ठेवा. अतिलोभापायी लाभ घालवून बसण्याची वेळ येऊ शकते.

शेअर्समध्ये किती पैसे गुंतवावेत?

100 वजा तुमचे वय केल्यावर जी संख्या राहते  तेवढे टक्के पैसे शेअर्स मध्ये गुंतवावेत. समजा तुम्ही 40 वर्षाचे आहात आणि तुमच्याकडे 1 लाख रुपये गुंतावुकीसाठी उपलब्द्ध असतील तर तर 100 वजा 40 म्हणजे 60 टक्के म्हणजे 60000 रुपये शेअर मार्केट मध्ये गुंतवावेत.राहिलेले पैसे नियमित व्याज देणाऱ्या अथवा अन्य पर्यायामध्ये गुंतवावेत.

पैशाची वाढ करण्यासाठी शेअर मार्केट हा  एक चांगला पर्याय आहे. फार पूर्वी कमीतकमी 50 शेअर्सचा लॉट खरेदी करावा लागत असे. पण आता प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असे 5,10, 20 असे शेअर्स सुद्धा विकत घेण्याची सुविधा उपलब्ध झाली. तेव्हा या सुविधेचा फायदा घेऊन दीर्घ काळात चांगली संपत्ती निर्माण करण्यासाठी शेअर्समधील गुंतवणुकीचा पर्याय देखील नक्कीच निवडावा.