केंद्र सरकार कडून वर्षातून दोनदा DA आणि DR दिले जाते. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पूढील काही महिन्यात आणखी एकदा गूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने अलिकडेच घेतला होता. त्यामुळे पूढील काळात सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
Table of contents [Show]
वर्षातून दोनदा होतो बदल
केंद्र सरकार या वर्षी जुलैमध्ये महागाई भत्त्यात आणखी 4 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. डिए (DA) आणि डिआर (DR) मध्ये वर्षातुन दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये बदल केले जातात. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. तर पेंशनधारकांना महागाई सवलत भत्ता दिला जातो.
किती वाढणार पगार
मार्चमध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीचा थेट फायदा 47.58 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख पेंशनधारकांना होत आहे. याचा फायदा एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेंन्शनधारकांना होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या केंद्रिय कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता दिला जातो. यापूढे तो 42 टक्के दिला जाऊ शकतो.
कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता
कर्मचारी आणि पेंन्शनधारकांसाठी महागाई भत्ता दर महिन्याला कामगार ब्युरोने जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे मोजला जातो. लेबर ब्युरो हा कामगार मंत्रालयाचा भाग आहे. यापूर्वी 1 जुलै 2022 पासुन डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली होती, तेव्हापासून महागाई भत्ता हा 38 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कर्मचार्यांच्या DA वाढीची गणना करण्याचे सूत्र
आता, जर आपण PSUs (सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स) मध्ये काम करणार्या लोकांच्या महागाई भत्त्याबद्दल बोललो, तर गणना करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत अशी आहे -
महागाई भत्ता टक्केवारी = [ गेल्या 3 महिन्यांतील ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (आधारभूत वर्ष 2001 = 100)-126.33)] x100
7व्या वेतन आयोगाच्या मॅट्रिक्सनुसार अधिकारी श्रेणीच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.
पेन्शन किती वाढणार?
जर पेन्शनधारकाची मूळ पेन्शन 31,550 रुपये असेल . त्यानंतर, मूळ वेतन - रु. 31,550 असेल. आतापर्यंत दिलेला महागाई भत्ता (DA) - 38% - रु 11,989/महिना असेल. नवीन महागाई भत्ता (DA) दरमहा - 42% - रु 13,251/महिना असेल. तर महागाई भत्ता (DA) 4% ने वाढल्याने पगारात 1262 रुपये/महिना वाढ होईल .
DA वाढ
महागाई भत्त्याची थकबाकी महागाई भत्त्याच्या वाढीसह वितरित केली जाईल. महागाई भत्ता/महागाई मदत (DR) वाढीच्या घोषणेसोबतच दोन महिन्यांची थकबाकीही दिली जाईल. यामध्ये जानेवारी 2023 आणि फेब्रुवारी 2023 साठी वाढीव DA भरण्याची शक्यता आहे. म्हणजेच, मार्च 2023 च्या पगार/पेन्शनसह रुपये 1262 + रुपये 1262 चे अतिरिक्त पेमेंट केले जाईल.