Budget 2023 Update: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 (UNION BUDGET 2023-24) सादर केला. हा सर्वसाधारण अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्या कार्यकाळातील पाचवा आणि नरेंद्र मोदी सरकारचा 11वा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या बाबी सादर केल्यात. आपण विकासाच्या मार्गावर आहोत हे देखील त्यांनी अनेक बाबींमधून सिद्ध केले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंदाजपत्रक जाहीर करताना सांगितले की, सुमारे 9 वर्षांत दरडोई उत्पन्न दुप्पट होऊन 1.97 लाख रुपये झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार वाढला आहे आणि गेल्या 9 वर्षात ती 10व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतून जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
2022 मध्ये UPI द्वारे 126 लाख कोटी रुपयांचे….. (126 lakh crore through UPI in 2022….)
2022 मध्ये UPI द्वारे 126 लाख कोटी रुपयांचे 7,400 कोटी डिजिटल पेमेंट करण्यात आले आहे. म्हणजेच आपण प्रगतीच्या दिशेने आहोत, हे डिजिटल इंडियाच्या स्वप्नाकडे महत्वाचे पाऊल आहे. 47.8 कोटी प्रधानमंत्री जन धन बँकेत 44.6 कोटी लोकांची खाती आहेत. पीएम सुरक्षा विमा योजना आणि पीएम जीवन ज्योती योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळाले आहे. 2014 पासून देशभरात सर्वसमावेशक वाढीसाठी लक्ष्यित लाभांच्या सार्वत्रिकीकरणासह योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे श्रेय केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिले जात आहे.
अर्थमंत्री म्हणाल्या, 5जी सेवांवर आधारित प्रयोग विकसित करण्यासाठी 100 प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील, ज्यामुळे नवीन संधी, व्यवसाय मॉडेल खुले होतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. सरकारने 2,516 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 63,000 प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) च्या संगणकीकरणाचे काम सुरू केले आहे.