गोव्यातील असंख्य रेस्टॉरंट्स आणि खाण्यापिण्याचे ठिकाणे हे पर्यटन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहेत, असे सांगून, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) ने एका अभ्यासात खुलासा केला आहे की गोव्यात पर्यटकांकडून 50% पैसा हा खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्सवर खर्च केला जातो.
“गोव्याच्या अर्थव्यवस्थेत रेस्टॉरंट्स, कॅफे, बार आणि क्लबचे महत्त्व अधोरेखित करणारा अहवाल आहे,” या शब्दात NRAI गोवा चॅप्टर लॉन्च करताना,NRAI अध्यक्ष कबीर सुरी यांनी म्हटले आहे.
गोव्यात खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयामागे 50 पैसे थेट खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्सवर खर्च केले जातात कारण तेच इथले मुख्य आकर्षण आहे. लोक एकतर रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये जातात किंवा नाईट क्लबमध्ये जातात आणि तेथे ते पुन्हा खातात किंवा ड्रिंक्स करतात. असे NRAI च्या अहवालात म्हटले आहे.
Launch of NRAI chapter Goa✨#Networking #NationalRestaurantAssociationOfIndia #NRAIGoaChapter pic.twitter.com/qEl2A2P0i6
— NRAI (@NRAI_India) February 4, 2023
गोवा राज्याच्या लोकसंख्येपैकी सुमारे 45% लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्थानिक रेस्टॉरंट उद्योगात कार्यरत आहेत. राज्यात सुमारे 8,000 नोंदणीकृत उपाहारगृहे आहेत. चांगले खाद्यपदार्थ आणि नाईटलाइफचे पर्याय जाणून घेऊनच प्रवासी गोव्यात पर्यटनासाठी येत असतात. अतिशय चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट्स आणि बारच्या सुविधा गोव्यात झाल्यामुळे लोकांना अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत, अशा शब्दांत NRAI अध्यक्ष कबीर सुरी यांनी टिप्पणी केली.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील या समारंभाला उपस्थित होते. सावंत म्हणाले की, “आम्ही रेस्टॉरंट उद्योगात अधिक गुंतवणूक आणण्यासाठी, आमच्या शेफ आणि रेस्टॉरंटसाठी अधिक संधी निर्माण करण्यासाठी आणि गोव्यातील खाद्यपदार्थ जगासमोर आणण्यासाठी प्रयत्नपूर्वक काम करू." गोव्यात नवनवे रोजगार निर्माण करण्यासाठी आणि देशोविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकार प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
Mayem Lake View - Set amidst the picturesque surroundings of a sleepy Goan village, you will find the lake surrounded by hills forest and wild cashew trees. Enjoy the great outdoors with water front activities, bungeejumping & spend an amazing time with your friends and family. pic.twitter.com/u58Xyu5CAB
— Goa Tourism (@TourismGoa) December 12, 2022
देशभरातील तरुणाईला गोव्याचे विशेष आकर्षण आहे. अनेक कॉलेजवयीन तरुण पिकनिकसाठी गोव्याला पसंती देतात. गोव्यातील समुद्रकिनारे, सी फूड आणि पर्यायाने स्वस्त असलेली मद्यपेय ही तरुणांना खुणावत असतात. गोव्यात देशोविदेशातून पर्यटक येत असतात. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी देखील गोवा सरकार विशेष प्रयत्न करत असते. गेल्या काही वर्षांपासून गोवा हे देशातील महत्वाचे पर्यटन स्थळ राहिले आहे. येत्या काळात गोव्यात पर्यटकांना देशी-विदेशी खाण्या-पिण्याच्या सुविधा प्रदान करण्याचा प्रयत्न NRAI गोवा चॅप्टरकडून केला जाणार असल्याचे उपस्थितांनी म्हटले आहे.