Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Calculator: दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करेल लखपती! या टॉप 3 मिडकॅप फंडांतून मिळेल हमखास परतावा

SIP Calculator: दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करेल लखपती! या टॉप 3 मिडकॅप फंडांतून मिळेल हमखास परतावा

SIP calculator : सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार एसआयपीवर (Systematic Investment Plan) विश्वास ठेवतात. एकीकडे शेअर बाजारातलं अनिश्चित वातावरण, होणाऱ्या उलथापालथी यामुळे गुंतवणूकदार इक्विटी फंडावर अधिक विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना अधिक सुरक्षित वाटणारा पर्याय म्हणजे एसआयपीच आहे. किरकोळ गुंतवणूकदार यालाच अधिक प्राधान्य देतात.

एएमएफआयनं (Indian Mutual Fund Industry) यासंबंधी एक अहवाल दिलाय. त्यांनी मार्च महिन्यातली काही आकडेवारीनुसार जाहीर केलीय. इक्विटीच्या श्रेणीमध्ये एकूण 20,534 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. डेब्ट फंडातून (Debt Funds) 56,844 कोटी रुपयांची भलीमोठी रक्कम काढण्यात आली. इक्विटी प्रकारामध्ये मिडकॅप म्युच्युअल फंडमध्ये (Mid Cap Mutual Funds) 2193 कोटी रुपयांचा इन्फ्लो आला. फेब्रुवारीमध्ये याच प्रकारात 1816 कोटी रुपये आणि जानेवारीमध्ये 1628 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. झी बिझनेसनं याविषयीचं वृत्त दिलंय.

टॉप-3 मिडकॅप फंडांचे परतावा जाणून घ्या

‘एएमएफआय’च्या वेबसाइटवर काही आकडेवारी नमूद करण्यात आली आहे. या माहितीनुसार, 5 वर्षांच्या कालावधीतल्या परताव्याच्या आधारावर, क्वांट मिड कॅप फंडनं (Quant Mid Cap Fund) सरासरी 17.93 टक्के, पीजीआयएमनं (PGIM India Midcap Opportunities Fund) 17.91 टक्के आणि निप्पॉन इंडियानं (Nippon India) सरासरी परतावा दिलाय. ग्रोथ फंडानं 14.18 टक्के परतावा दिला. जर पाच वर्षांपूर्वी या फंडांमध्ये 5000 रुपयांची एसआयपी केली गेली असती, तर त्याचं मूल्य आज काय असतं, हे एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीनं समजून घेऊ. ही आकडेवारी आणि माहिती संबंधित संकेस्थळावर 13 एप्रिल 2023पर्यंतच्या कामगिरीवर आधारित असल्याचं दर्शवण्यात आलंय.

पीजीआयएम इंडिया मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड

व्हॅल्यू रिसर्च कॅल्क्युलेटरनुसार, समजा एखाद्या गुंतवणूकदारानं पाच वर्षांपूर्वी क्वांट मिड कॅप या फंडात 5000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर आज त्याच्या फंडाचं मूल्य 5.41 लाख रुपये झालं असतं. तर गुंतवणुकीची एकूण रक्कम तीन लाख रुपये झाली असती. या योजनेत किमान 1000 रुपये आणि किमान 5000 रुपये एसआयपी गुंतवायला लागतात. एनएव्ही 130.42 आहे तर निधीचा आकार 1737.46 कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणं जर एखाद्या गुंतवणूकदारानं पाच वर्षांपूर्वी पीजीआयएम इंडिया मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंडात (PGIM India Midcap Opportunities Fund) 5000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर त्याच्या फंडाची किंमत आज जवळपास 5.20 लाख रुपये झाली असती. गुंतवणुकीची एकूण रक्कम असती तीन लाख रुपये. या मिडकॅप फंडात किमान एसआयपी 1000 आणि 5000 गुंतवता येतात. त्याची एनएव्ही 42.13 रुपये आहे तर निधीचा आकार 7948 कोटी रुपये आहे.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड

एखाद्या गुंतवणूकदारानं पाच वर्षांपूर्वी निप्पॉन इंडिया ग्रोथ या फंडामध्ये 5000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर आज त्याचा निधी 4.76 लाख रुपये इतका झाला असता. तर गुंतवणुकीची एकूण रक्कम तीन लाख रुपये झाली असती. या मिडकॅप फंडात कमीतकमी 100 रुपयांची गुंतवणूक आणि 100 रुपयांची एसआयपी गुंतवली जाऊ शकते. त्याची एनएव्ही 43.65 रुपये इतकी आहे, तर निधीचा आकार 13,754 कोटी रुपये इतकी आहे.

(डिस्क्लेमर : म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही बाजारातल्या जोखमींच्या अधीन असते. 'महामनी' अशा कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी सेबी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घ्या)