Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LinkedIn Report: जागतिक मंदी असतानाही, भारतातील 5 पैकी 4 लोक आहेत नवीन नोकरीच्या शोधात!

LinkedIn Report

LinkedIn Report: लिंक्डइनने जागतिक स्तरावरील आर्थिक मंदी दरम्यान एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यानुसार 2023 मध्ये 5 पैकी 4 भारतीय लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत. चला तर या अहवालाबद्दल जाणून घेऊयात.

LinkedIn Report: सध्या आपल्याला जागतिक आर्थिक मंदीचे संकेत देणाऱ्या बातम्या पाहायला किंवा ऐकायला मिळत आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी नोकरकपात करायला सुरुवातही केली आहे. अशातच प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डडीनने(LinkedIn) एक अहवाल प्रसिद्ध केलायं. या अहवालानुसार भारतातील 5 पैकी 4 लोक 2023 मध्ये नवीन नोकरीच्या शोधात आहेत असं म्हटलंय. जाणून घेऊयात या अहवालाबद्दल सविस्तरपणे.

भारतीयांचा स्वतःच्या कौशल्यांवर आहे पूर्ण विश्वास

लाखो लोकांपर्यंत पोहचलेल्या लिंक्डडीन(LinkedIn) या सोशल माध्यमाने बुधवारी(18 जानेवारी 2023) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. लिंक्डइनच्या अहवालानुसार, 18 ते 24 वयोगटातील 88 टक्के नोकरदार आणि  45 ते 54 वयोगटातील 64 टक्के नोकरदार सध्या नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. सध्या जागतिक मंदीचे वारे घोंगावत असतानाही नोकरदार वर्ग त्यांच्या कौशल्यांमध्ये गुंतवणूक करून प्रगतीच्या मार्गाने चालण्याचा निर्णय घेत आहे. 
लिंक्डडीनने(LinkedIn) केलेल्या सर्वेक्षणानुसार 78 टक्के कर्मचार्‍यांनी सांगितले की, जर त्यांनी त्यांची नोकरी सोडली तर, त्यांना अर्ज करण्यासाठी अनेक संधी मिळतील आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. लिंक्डइन करिअर एक्सपर्ट नीरजिता बॅनर्जीच्या(LinkedIn career expert Neerjita Banerjee) म्हणण्यानुसार, सध्या कठीण आर्थिक परिस्थिती असूनही, भारतीय कर्मचार्‍यांचा विकास आणि पुढे जाण्याच्या क्षमतेवर विश्वास आहे.

44 टक्के लोक कौशल्य शिकण्यास देतात प्राधान्य

सर्वेक्षणात 32 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असून त्यांना वाटते की त्यांना आणखी चांगली संधी मिळू शकते. लिंक्डइन वर्कफोर्स कॉन्फिडन्स इंडेक्सनुसार(LinkedIn Workforce Confidence Index), भारतातील पाच पैकी फक्त दोन म्हणजेच 43 टक्के कर्मचारी आर्थिक मंदीसाठी तयार आहेत. तथापि, सध्या सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे कर्मचारी स्वतः नोकरी बदलण्यासाठी उपाययोजना करत आहेत. भारतातील अर्ध्याहून अधिक म्हणजेच 54 टक्के नोकरदार योग्य लोकांच्या संपर्कात राहून नेटवर्क वाढवत आहेत. याव्यतिरिक्त, 44 टक्के लोक आज नवीन इन-डिमांड आणि हस्तांतरणीय कौशल्ये शिकण्यास प्राधान्य देत आहेत.