सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनासाठी राज्य सरकारचा यापूर्वी 15 बँकांशी करार झाला आहे. आता तीन खासगी बँकांना परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारने बुधवारी तसा आदेश दिला आहे.
या तीन बँकांमध्ये कर्नाटक बँक, जम्मू-काश्मिर बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे. या बँकांच्या माध्यमातून देखील आता वेतन, निवृत्तीवेतन भत्ते यासंबंधी व्यवहार करता येतील. राज्य सरकारचे बँकिंग व्यवहार हाताळण्यासाठी या तीन बँकांना नव्याने परवानगी देण्यात आली आहे. या तीन बँकांशी राज्य सरकारने अलिकडेच करार केले आहेत. यानंतर बुधवारी याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे.
‘या’ 15 बँकांशी यापूर्वी करार (Agreement with 15 banks)
यापूर्वी 15 बँकांशी करार करण्यात आला आहे. यामध्ये दी फेडरल बँक, ए. यू. स्मॉल फायनान्स बँक लि., येस बँक लि., अॅक्सीस बँक लि., आयडीएफसी फस्र्ट बँक लि., सीटी युनियन बँक लि., कोटक महिंद्रा बँक लि., एसबीएम बँक इंडिया लि., इंडस्इंड बँक लि., एचडीएफसी बँक लि., आरबीएल बँक लि., आयसीआयसीआय बँक लि., जना स्मॉल फायनान्स् बँक लि.,उज्जीवन स्मॉल फायनान्स् बँक लि.,स्टँडर्ड चार्टर्ड बँक या बँकांचा समावेश आहे.
या 3 बँकांच्या महाराष्ट्रात किती शाखा आहेत?
आता नव्याने या 3 बँकाना परवानगी देण्यात आलेली आहे. यातील जम्मू आणि काश्मीर बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेची स्थापना १९३८ मध्ये झाली. याच्या महाराष्ट्रात 15 शाखा आहेत. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या 45 शाखा महाराष्ट्रात आहेत. कर्णाटक बँकेच्या महाराष्ट्रात 55 शाखा आहेत. यात मुंबई महानगर प्रदेशमध्ये सर्वाधिक तर पुणे जिल्हा, रायगड जिल्हा, नागपूर जिल्ह्यात देखील शाखा आहेत. सांगली सातारा, कोल्हापूर, नांदेड, औरंगाबाद याठिकाणी देखील या बँकेच्या शाखा आहेत.