इन्कम टॅक्स विभागाने ट्विटरद्वारे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार असेसमेंट वर्ष 2022-23 आणि आर्थिक वर्ष 2021-22 साठी 25 जुलैपर्यंत आतापर्यंत 3 कोटी करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल केले. पगारदार व्यक्तींसाठी आयटीआर रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 आहे.
जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे किंवा परदेशात प्रॉपर्टी आहे किंवा विदेशातून उत्पन्न मिळत असेल, किंवा मागील वर्षभरात एका लाखापेक्षा अधिक वीज बिल आले असेल किंवा तुमच्या बँकेत एक कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. तर तुम्हाला आयटीआर रिटर्न फाईल करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आयटीआर रिटर्न फाईल केले नसेल तर तुमच्याकडे फक्त 4 दिवस बाकी आहेत. 31 जुलैनंतर रिटर्न भरल्यास तुम्हाला 5 हजार रूपये दंड भरावा लागेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या आत आहे. त्याना 1 हजार रूपये दंड भरून रिटर्न फाईल करता येईल.
असेसमेंट वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स विभागाच्या नवीन ई-फायलिंग साईटवर 15 मार्च, 2022 पर्यंत 6.63 कोटी करदात्यांनी रिटर्न फाईल केले. तर शेवटच्या दिवशी सुमारे 5.43 लाख आयटीआर फाईल केले गेले. त्या तुलनेत मागील वर्षी शेवटच्या दिवशी 4.77 लाख लोकांनी रिटर्न फाईल केले होते.
असेसमेंट वर्ष 2021-22 मध्ये आयटीआर रिटर्न फाईल केलेल्या एकूण 6.63 कोटी करदात्यांपैकी उत्पन्नाच्या स्लॅबनुसार करदात्यांनी खालीलप्रमाणे ITR Return फाईल केले होते.
आयटीआर फॉर्म | करदाते | टक्केवारी |
ITR-1 | 3.03 कोटी | 46 % |
ITR-2 | 57.6 लाख | 9 % |
ITR-3 | 1.02 कोटी | 15 % |
ITR-4 | 1.75 कोटी | 26 % |
ITR-5 | 15.1 लाख | 2 % |
ITR-6 | 9.3 लाख | 1.40 % |
ITR-7 | 2.18 लाख | 0.32 % |
25 जुलै, 2022 पर्यंत इन्कम टॅक्स विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 10,39,72,052 लोकांनी साईटवर रजिस्टर केले. तर 3,10,63,484 युझर्सनी असेसमेंट वर्ष 2022-23 साठी रिटर्न फाईल केले. यापैकी 2,50,34,046 आयटीआर व्हेरिफाय झाले आहेत. तर 1,83,48,024 आयटीआर प्रक्रियेमध्ये आहेत.
या आकडेवरून असे दिसून येते की, मागील वर्षीच्या तुलनेत अजून बऱ्याच जणांचे आयटीआर फाईल झालेले नाही. त्यात आता फक्त 4 दिवस शिल्लक राहिल्याने सरकार ही तारीख वाढवण्याची शक्यता टॅक्स तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.