इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) 2021-22 या आर्थिक वर्षात 20 मार्चपर्यंत सुमारे 2.26 कोटी टॅक्सधारकांना 1.93 कोटी रूपये रिफंड केले आहेत. सीबीडीटी (CBDT)ने 1 एप्रिल 2021 ते 20 मार्च 2022 या काळात 2.26 कोटी करदात्यांना 1,93,720 कोटी रूपयांचा कर परतावा दिला आहे. यात 70,977 कोटी रूपयांचा व्यक्तिगत, तर 1,22,744 कोटी रूपयांचा कॉर्पोरेट कर परताव्याचा समावेश आहे. याबाबत इन्कम टॅक्स विभागाने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
CBDT issues refunds of over Rs. 1,93,720 crore to more than 2.26 crore taxpayers from 1st Apr,2021 to 20th March,2022. Income tax refunds of Rs. 70,977 crore have been issued in 2,23,99,122cases &corporate tax refunds of Rs. 1,22,744 crore have been issued in 2,34,293cases(1/2)
— Income Tax India (@IncomeTaxIndia) March 24, 2022
असे चेक करा टॅक्स रिफंडचे स्टेटस
तुमचा इन्कम टॅक्स रिफंड आला की नाही हे पाहायचे असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन चेक करू शकता. सर्वप्रथम इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर जा. तिथे तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. त्यानंतर ई-फाईल यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला तिथे इन्कम टॅक्स रिटर्न्सचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर व्हिव्ह फाईल रीटर्न हा ऑप्शन निवडा. इथे तुम्ही तुमचे रीटर्न फाईल स्टेट्स चेक करू शकता. तुम्ही यावर्षी किती टॅक्स भरला आहे? आणि तुम्हाला त्याचा रिफंड कधी आणि किती मिळणार, हे तुम्ही पाहू शकता.
अशाच पद्धतीने तुम्ही NSDL च्या वेबसाईटवरही स्टेट्स चेक करू शकता. इथे तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक टाकून माहिती सबमिट करायची आहे. ती दिल्यावर तुम्ही तुमची इन्कम टॅक्स रिटर्नची माहिती पाहू शकता.