Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Messi vs Ronaldo: मेस्सी व रोनाल्डोची फक्त मॅच पाहण्यासाठी खरेदी केले 21.2 करोडचे तिकिट

Messi vs Ronaldo

Image Source : /www.vanguardngr.com

Messi vs Ronaldo Match Date: मेस्सी व रोनाल्डोची फक्त फुटबाॅल मॅच पाहण्यासाठी चक्क एका चाहत्याने 21.2 करोडचे तिकिट खरेदी केले आहे. हे एवढे महागडे तिकिट कोणी व का खरेदी केले पाहुयात?

Messi vs Ronaldo Football Match: ख्रिस्तीयानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याने अल नासर क्लबशी (AL Nasar Club) सर्वात महागडा करार केल्यानंतर तो पहिल्यांदा या कल्बकडून खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे फुटबाॅलचा आणखी एक हिरा म्हणजे मेस्सी सोबत त्याचा हा सामना असणार आहे. अशा या रोनाल्डो व मेस्सी  या दिग्गज खेळाडूंचा सामना पाहण्यासाठी चक्क एका चाहत्याने चाहत्याने 21.2 करोडचे तिकिट खरेदी केले आहे.

कोणी खरेदी केले तिकिट (Who Bought The Ticket)
या फुटबाॅल सुपरसस्टार्सला एकत्र खेळणे पाहणे म्हणजे देव पावल्यासारखे आहे. कारण या महान खेळांडूचे संपूर्ण देशभरात असंख्य चाहते आहे. त्यामुळे हे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी काहीही करू शकतात. आता हेच पहा ना, या दोन दिग्गज खेळांडूना एकत्र खेळताना पाहण्यासाठी एका सौदी रिअल इस्टेटच्या मोगलने लिलावात 21.2 करोडचे तिकिट जिंकले आहे. म्हणजेच या स्टार खेळांडूचा सामना पाहण्यासाठी या चाहत्याने 21.2 करोडचे तिकिट खरेदी केले आहे. विशेष म्हणजे या तिकिटावर चाहत्याला खेळाडूंसोबत फोटो काढण्याची संधी आणि लॉकर रूममध्ये प्रवेश करण्यासह अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे. 

कधी होणार हा सामना (When will this Match)

रोनाल्डो व मेस्सीचा हा मुकाबला आज (19 जानेवारी 2023) ला रंगणार आहे. पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) आणि रियाद एसटी इलेवन (Riyadh STXXI) यांच्यात हा सामना असणार आहे. किलियन एमबापे, सर्जियो रामोस व नेमार सारखे खेळाडूदेखील असणार आहे. रोनाल्डोची अल नसरकडून फुटबॉल सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) व लिओनेल मेस्सी (Lionel Messi) या दोघांना 2020 या वर्षानंतर पहिल्यांदा समोरासमोर खेळताना पाहायला मिळणार आहे.  हा सामना रियाद येथील फहद स्टेडियमवर रंगणार आहे. हे टिकिट आॅनलाइन खरेदी करण्यासाठी 20 लाखापेक्षा अधिक रिक्वेस्ट आल्या आहेत. त्यापैकी सौदीच्या एका यशस्वी बिजनेस मॅनने हे तिकिट खरेदी केले आहे. फुटबाॅल इतिहासातील हे सर्वात महागडे तिकिट असणार आहे.