Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबसोबत करार केला आहे. हा करार त्याला वर्षाला जवळजवळ 1800 कोटी देणार आहे. करारचा फायदा काही तासातच अल नासर क्लबलादेखील झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. ते कसे हे थोडक्यात जाणून घेऊयात.
पहा, कसा झाला फायदा?
सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबसोबत नुकताच रोनाल्डोने 1800 कोटी रूपयांचा करार केला आहे. या करारनंतर 24 तासातच अल नासर क्लबला मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे. रोनाल्डोचा जगात एक मोठा चाहता वर्ग असल्याने, करार केलेल्या या क्लबलादेखील मोठी प्रसिध्दी मिळाली. या क्लबचे फॉलोवर्स पाहता, पाहता अनेक पटींनी वाढले. रोनोल्डोने करार करण्यापूर्वी या क्लबचे फॉलोवर्स साडे आठ लाख इतके होते. आता या संख्येत वाढ होऊन ती पन्नास लाखांच्या घरात पोहोचले आहे. रोनोल्डो पहिल्यांदाच एखाद्या आशियाई क्लबसोबत खेळणार आहे. यापूर्वी तो एका युरोपीय क्लबसोबत खेळत होता.
रोनाल्डो ठरणार प्रेरणादायक
रोनाल्डोच्या लोकप्रियतेचा फायदा हा अल नासर क्लबला 24 तासात झालेचे दिसत आहे. या महागडया करारानंतर सौदी अरेबियातील अल नासरच्या क्लबच्या फॉलोवर्समध्ये वेगाने वाढ झाली आहे. रोनाल्डो म्हणतो की, मी पहिल्यांदा एका वेगळया देशात एका नव्या फुटबॉल लीगमध्ये खेळण्यास उत्साही आहे. ज्या पध्दतीने अल नासर हे क्लब काम करित आहे. ते खरचं प्रेरणा देणारे आहे. माझ्या सहकाऱ्यांसोबत या क्लबशी जोडल्याचा मला खूप आनंद होत आहे. आम्ही सर्व एकत्रित होऊन या संघाला यशाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू.