IPL Watching Record Break on Jio : महेंद्रसिंग धोनी एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत अनेक रोकॉर्ड आपल्या नावावर करुन घेतले आहे. त्यातच आयपीएल 2023 मधील चेन्नई सुपर किंग्जचा दुसरा सामना चाहत्यांसाठी फार जास्त खास ठरला. या सामन्यात परत एकदा धोनीने आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. आठव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या धोनीने ओव्हरच्या दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर आपले षटकार धडकवले. परंतु तोच प्रयत्न तो तिसऱ्या चेंडूवर करायला गेला आणि तो बाद झाला.
Table of contents [Show]
1.7 कोटी लोकांनी तोडला रोकॉर्ड
तसा धोनी सगळ्यांचा चाहता आहे. त्याने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आयपीएल 2023 मधील चेन्नई सुपर किंग्जचा दुसरा सामन्यात देखील त्याने तीनच चेंडूची खेळी खेळली. मात्र त्याची ही खेळी बघण्यास 1.7 कोटी लोकांनी जिओ सिनेमा अॅपचा आधार घेतला. अतिशय कमी वेळात, इतक्या प्रचंड प्रमाणात आणि तेसुध्दा एकाच क्षणी ऑनलाईन आयपीएल बघण्याचा हा प्रेक्षकांचा नवा विक्रम होता. महत्वाचे म्हणजे याआधी देखील धोनीचाच सामना बघण्यास अॅपवर चाहत्यांनी अशी गर्दी केली होती.
धोनीने केल्या 5000 धावा पूर्ण
आयपीएल 2023 मधील चेन्नई सुपर किंग्जच्या दुसऱ्या सामन्यात धोनीने केवळ 12 च धावा काढल्यात. मात्र त्याने आपल्या कारकिर्दित आयपीएल मधील चक्क 5000 धावा पूर्ण केल्या. अशा प्रकारच्या धावा पूर्ण करणारा महेंद्रसिंग धोनी हा पाचवा भारतीय खेळाडू आहे.
धोनीने रचला इतिहास
वास्तविक पाहता पहिला सामना सुरु होण्यापूर्वीच धोनीच्या पायाला दुखापत झाली होती. तरीसुध्दा चेन्नई सुपरकिंग्ज संघाने सेमवारला लखनौ सुपर जायंट्स विरुध्द सामना खेळला. आणि यात धोनी फक्त तीन चेंडू खेळला, पण इतक्या कमी कालावधीत त्याने इतिहास रचला. आणि आयपीएलच्या इतिहासात हे कुठल्याच खेळाडूला जमलं नाही, ते माहीने करुन दाखविलं
गंभीर झाला ट्रोल
त्यातचं लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीर धोनीचे सिक्सर पाहून आश्चर्यचकित राहीला. आणि गंभीरचा असा अवाक झालेला चेहरा बघुन नेटिझन्सनी मात्र सोशल मिडियावर त्याला ट्रोल करीत मीम्सचा पाऊस पाडला.