Union Budget 2023 सादर होताना त्याला बाजाराचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे देखील गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले होते. आज बजेटच्या दिवशी शेअर बाजारात सकाळच्या वेळी बाजार उघडताना चांगली तेजी दिसून आली. सकाळी 450 अंकाची उसळी घेतली होती.
मात्र बजेट सादर होताना पहिल्या तासात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बाजारात या कालावधीत ना खूप चांगले स्वागत झाले ना नकारात्मक प्रतिसाद मिळाला. 60000 टप्पा ओलंडलेला सेन्सेक्स हा 12.20 च्या सुमारास त्यापेक्षा खाली आली होता. मात्र एकूण सकाळपासून विचार केला तर बाजार उघडल्यापासून सेन्सेक्स 626 अंकांच्या वाढीसह 60179 अंकावर तर निफ्टी 353 अंकांच्या वाढीसह 18444 वर या कालावधीत पोचला होता.
आयकर स्लॅब जाहीर होताना सेन्सेक्सची 180 अंकांची उसळी
मात्र आयकर स्लॅब जाहीर होताना चित्र वेगाने बदलू लागले. सकाळी सुरुवातीला दिसलेली तेजी पुन्हा दिसू लागली. आयकर स्लॅब जाहीर होताना शेअर मार्केटमध्ये जोरदार उसळी बघायला मिळाली. या 10 मिनिटांच्या कालावधीत सेन्सेक्सने 180 अंकांची उसळी घेतली होती. आयकरविषयीच्या घोषणेला शेअर मार्केटने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. Income Tax Slab कररचना ही मध्यम वर्गीय गुंतवणूकदारांसाठी विशेष महत्वाची ठरते.
दुपारपर्यंत शेअर मार्केटमध्ये 1200 अंकांची उसळी
बजेट संपता संपता सेन्सेक्समध्ये मोठी वाढ बघायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 1200 च्या वाढीसह 60 हजार 750 अंकावर पोचला होता. आज बजेट सादर होताना सकाळीच बाजार सकाळी 450 अंकाच्या उसळीसह उघडला होता. पहिल्या तासाभरात गुंतवणूकदारांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण आयकर स्लॅबविषयी निर्मला सीतारामन बोलू लागल्यावर पुढच्या काही मिनिटात बाजार वेगाने उसळी घेऊ लागला होता. यानंतर वाढ होताना दिसत होती. एकूणच दुपारपर्यंत विचार केला तर शेअर मार्केटने बजेटचे उत्साही स्वागत केल्याचे दिसून येत आहे. सेन्सेक्स प्रमाणेच निफटीमध्ये 256 अंकांची वाढ होत 17918 वर पोचला होता.