Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Zomato: आता Zomato ची फूड डिलिव्हरी 10 मिनिटांत नाहीच, कंपनी करते आहे हे बदल!

Zomato

झोमॅटोने गेल्या वर्षी आपली बहुचर्चित इन्स्टंट सेवा (Instant Service) लाँच केली. यामध्ये कंपनी 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी (10 Minute Food Delivery) देत ​​होती. ही सेवा फिनिशिंग स्टेशनच्या (Finishing Station) माध्यमातून दिली जात होती. मात्र आता कंपनीने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

10 मिनिटांत फूड डिलिव्हरी (10 Minute Food Delivery) ही सेवा देणे Zomato ला फायदेशीर ठरत नसल्याचे समजते आहे. कंपनीने ही सेवा सध्या स्थगित करत असून आम्ही अशाच प्रकारच्या सेवा विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत असे म्हटले आहे.

फूड डिलिव्हरी ऍप Zomato आपली दहा मिनिटांत फूड डिलिव्हरी सेवा स्थगित करणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी Zomato Instant सेवा सुरू केली होती. मात्र वर्षभरातच कंपनीला ही सेवा स्थगित करावी लागली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की कंपनीने अलीकडेच आपल्या रेस्टॉरंट भागीदारांना ही सेवा स्थगित करणार असल्याचे कळवले होते. ही सेवा ग्राहकांना पुरवताना कंपनीला नफा होत नाहीये, अशी कंपनीची भावना आहे. कंपनी ही सेवा बंद करत नसून तिचे रीब्रँडिंग (Rebranding) करत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आता नवीन उत्पादन सेवा बाजारात आणण्याची योजना आखत आहे. कंपनी कमी किंमतीत जेवण देण्याचा (Low Value Packed Meals) प्रयोग करत आहे. यामध्ये थाली मील (Thali Meal) किंवा कॉम्बो मीलचा (Combo Meal) समावेश असेन. कंपनी यासाठी 10 मिनिटांत डिलिव्हरीची योजना ठेवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र नवीन सेवा सात ते दहा दिवसांत सुरू होऊ शकते. जरी कंपनी म्हणत असली की ते इन्स्टंट डिलिव्हरी सेवा बंद करत नाहीये, परंतु आपल्या भागीदारांसह ते नवीन सेवेवर काम करत आहे. कंपनी आपल्या व्यवसायाचे पुनर्ब्रँडिंग (Rebranding) करत आहे. या निर्णयाचा कोणालाही फटका बसणार नाहीये.

सेवा कधी सुरू झाली होती?

झोमॅटोने गेल्या वर्षी मार्चमध्ये आपल्या इन्स्टंट डिलिव्हरी सेवेची घोषणा केली होती. ही सेवा Zomato च्या फिनिशिंग स्टेशन्सद्वारे दिली जात होती. कंपनीने अशी पाच स्टेशन्स सुरू केली होती. यातील बहुतांश एनसीआर (NCR) भागात होते. अलीकडेच कंपनीने बंगळुरूमध्येही (Bangalore) ही सेवा सुरू केली होती. अलीकडच्या काळात अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी झोमॅटोला रामराम केला होता. कंपनीचे संस्थापक दीपंदर गोयल (Deepinder Goyal) यांनीच ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.