Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Zebronics Zeb-Iconic Lite Launched: अगदी स्वस्तात घ्या स्मार्टवॉच, तो ही ब्लूटूथ कॉलिंगसोबत आणखी...

Zebronics Zeb-Iconic Lite Launched

Image Source : http://www.beebom.com/

Zebronics Zeb-Iconic Lite Launched in India: सध्या स्मार्टवॉचबाबत मार्केटमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. स्मार्टफोन प्रमाणेच बाजारात एकापेक्षा एक स्मार्टवॉच येत आहेत. Zebronics Zeb-Iconic Lite चे स्मार्टवॉच नुकतेच लाँच करण्यात आले असून, ते एकदम स्वस्तात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टवॉचच्या किंमती व फीचरबाबत जाणून घेऊयात.

  Zebronics Zeb-Iconic Lite Launched in India: इंडियन मार्केटमध्ये इंडियन इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरर Zebronics ने एक स्वस्त स्मार्टवॉच आणले आहे. Zebronics Zeb-Iconic Lite स्मार्टवॉच असे त्याचे नाव असून, नवीन स्मार्टवॉचमध्ये झेब्रोनिक्स झेब आयकॉनिक लाइटने Always-On Display, 100 पेक्षा जास्त फेस आणि मेटल बॉडी सारखे फीचर्स दिले आहेत. या सर्व गोष्टींबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

स्मार्टवॉच किंमत (Smartwatch Price)

या स्मार्टवॉचची किंमत साधारण 2 हजार 999 रुपये आहे. हे वॉच अमेझॉन इंडिया आणि झेब्रोनिक्स स्टोअरवरून खरेदी करता येईल. हे स्मार्टवॉच सिलिकॉन बँड, गोल्ड ब्लू, सिल्वर आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. 

स्मार्टवॉच फिचर (Smartwatch Feature)

 या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि हार्ट रेट सेन्सर दिले गेले आहेत. या स्मार्टवॉचची बॉडी मेटल स्वरूपात आहे. या वॉचमध्ये 1.78 इंचाचा AMOLED स्क्रीन देखील आहे. जो 2.5D कर्व्ड स्क्रीन सोबत येते. हे स्मार्टवॉच सिंगल चार्जमध्ये 5 दिवस पर्यंत चालते. Zeb Iconic-Lite स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि व्हाइस असिस्टेंट सारख्या फीचर उपलब्ध आहेत. या वॉच मध्ये Siri आणि Android Google Assistant सारखे सपोर्ट देखील आहे. याशिवाय, स्मार्टवॉच मध्ये कॅलक्यूलेटर, म्यूझिक, कॅमेरा शटर, आणि दोन बिल्ट इन गेम्ससाठी कंट्रोल दिले गेले आहेत. आपण जर फिटनेस प्रेमी असाल तर या स्मार्टवॉच मध्ये 10 पेक्षा जास्त बिल्ट इन स्पोर्ट्स मोड आणि IP67 वॉटरप्रूफ रेटिंग सारखे फीचर्से देण्यात आले आहेत. स्मार्टवॉचला अॅपवरून स्मार्टफोन सोबत कंट्रोल करता येणार आहे. या वॉच मध्ये हार्ट रेट, SpO2 ट्रॅक, BP मॉनिटरिंग, कॅलरी काउंटर, पीडोमीटर, स्लीप मॉनिटर आणि मीडिएटिव ब्रीदिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचची किंमत फक्त 2 हजार 999 रुपये आहे. चला, तर मग आपल्या आवडीच्या कलरनुसार हे स्मार्टवॉच अगदी स्वस्तात खरेदी करा.