Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World's Most Expensive School: जगातल्या सर्वात महागड्या शाळेची फी ऐकून व्हाल थक्क!

Education in Switzerland

Education in Switzerland: जगातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक शाळा स्वित्झर्लंडमध्ये आहे. या शाळेत जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. इतकं महाग शिक्षण असूनही विद्यार्थी येथे प्रवेश का घेतात हे जाणून घ्या या लेखात.

शिक्षणाचं महत्व आज सगळ्या जगाने ओळखलं आहे. आपल्या मुलाबाळांना उत्तम, दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून अनेक पालक त्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देत असतात. आता चांगल्या शाळेची वैशिष्ट्ये कुठली हा प्रश्न तुम्हांला पडला असेल. चांगली शिक्षणपद्धती राबवणाऱ्या, पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहारज्ञान देणाऱ्या, मूल्यशिक्षण आणि नितीमूल्ये शिकवणाऱ्या शाळा खरे तर चांगल्या शाळा मानायला हव्यात. या सगळ्या गोष्टी एकाच शाळेत पद्धतशीर मिळतील की नाही, याबद्दल साशंकताच असते. परंतु जगात अशा काही निवडक शाळा आहेत जिथे या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. या लेखात आपण बघणार आहोत, जगातील अशी एक सर्वात महागडी शाळा जिथे देशोविदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. जाणून घेऊयात या शाळेची वैशिष्ट्ये.

जगातील सर्वात महागडी शाळा 

खरं तर जगातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक शाळा स्वित्झर्लंडमध्ये आहे. Collège Alpin International Beau Soleil नावाची ही शाळा जगातील सर्वात महागडी शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत सुमारे 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशीविशातील 50 पेक्षा अधिक देशांतील विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या शाळेत प्रवेश मिळवणे काही सोपे काम नाही. प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना खास परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. या शाळेचे वार्षिक शुल्क सित्झलँड चलनात 150,000 CHF इतकं आहे. भारतीय चलनात याचा विचार केला तर इथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला वर्षाला सुमारे 1.36 कोटी रुपये इतका खर्च लागू शकतो. आता यावरून तुम्हांला कल्पना आलीच असेल की इथं आपल्या पाल्याला शाळेत घालणं हे किती खर्चिक आहे.

Collège Alpin International Beau Soleil ही स्वित्झर्लंडमधील Villars-sur-Ollon शहरातील एक खाजगी बोर्डिंग शाळा आहे.या शाळेची स्थापना 1910 मध्ये झाली असून जगभरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ही शाळा एक शतकाहून अधिक काळ कार्यरत आहे.

Beau Soleil ही शाळा उच्च शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर जोरदार भर देते. या शाळेत इंग्रजी आणि फ्रेंच या दोन भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. ही शाळा 11-18 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षण देते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील International Board अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जातो.

वर उल्लेख केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी देखील ही शाळा विशेष प्रयत्न करते. क्रीडा, संगीत, नाटक आणि मैदानी शिक्षण यासह विविध अभ्यासक्रमाबाहेरील गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. शाळेमध्ये उत्कृष्ट असे आधुनिक क्रीडा संकुल, संगीत केंद्र आणि विज्ञान प्रयोगशाळा आहेत.शाळेत विद्यार्थ्यांना स्कायडायव्हिंग आणि सी-डायव्हिंग देखील शिकवले जाते. शाळेच्या कॅम्पसमध्ये स्वतःचे तबेले, रेस्टॉरंट आणि कला केंद्र देखील आहे.

Beau Soleil शाळेचा परिसर हा अत्यंत देखणा असून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि उत्साही वातावरण देण्याचा प्रयत्न शाळा करत असते.

स्वित्झर्लंडमधील शिक्षण महाग का?

कॉस्ट ऑफ लिव्हिंग: स्वित्झर्लंडमध्ये लोकांचे जीवनमान, राहणीमान अत्युच्च दर्जाचे आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या देशातल्या राहणीमाना साठी प्रचंड खर्च येत असतो. यामध्ये शिक्षण खर्चाचा आपसूकच आला. स्वित्झर्लंडच्या चलनातील 1 CHF म्हणजे भारतीय 90 रुपये इतके आहे. त्यामुळे तेथील महागाईचा अंदाज आपण लावू शकतो. 

उच्च दर्जाचे शिक्षण: उच्च-गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी स्वित्झर्लंडची ओळखले जाते. यासाठी आवश्यक संसाधने, सुविधा आणि कर्मचारी यामध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक आवश्यक असते. यामुळे जगातील दर्जेदार शिक्षण सुविधा आपल्या देशात निर्माण व्हाव्यात यासाठी भरपूर पैसे खर्च केले जातात.

खाजगी शाळांचे प्रस्थ: स्वित्झर्लंडमधील बर्‍यापैकी शाळा या खाजगी आहेत. म्हणजेच या शाळांना त्यांच्या सरकारकडून अनुदान दिले जात नाही. खाजगी शाळांनी (Self Finance Schools) त्यांचे सर्व खर्च हे विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शिकवणी शुल्कातून आणि देणग्यांद्वारे भरले पाहिजेत असा सरकारचा नियम आहे.ज्यामुळे या देशात शिक्षण शुल्क अधिक आहे.

आंतरराष्ट्रीय गुणवत्ता: उच्च-गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी स्वित्झर्लंडची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील ओळखला जातो. त्यामुळे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी हा देश पहिल्या पसंतीचा देश आहे. शिक्षणासाठी जगभरातून वाढत्या मागणीचा परिणाम उच्च शिक्षण शुल्कात झाला असल्याचे दिसते.

या सगळ्या कारणांमुळे इथले शिक्षण महागडे असले तरी ते जगभरातून विद्यार्थी येथे शिकायला येतातच. नाविन्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी ठरताना दिसते आहे. तसेच ज्यांना कुणाला इथले शिक्षण घेणे परवडत नाही, अशा अभ्यासू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्वित्झर्लंड सरकारतर्फे शिष्यवृत्ती योजना देखील चालवली जाते.

Source: https://rb.gy/ddeez