Freecharge Pay Later: सद्यस्थितीत buy now pay later ही सुविधा अनेक प्लॅटफॉर्मवर आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही फ्रीचार्ज अॅपचा वापर करत असाल तर आता तुमच्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध आहे. तर बघूया फ्री चार्ज पे लेटर कसं काम करते आणि त्याचे फायदे काय?
फ्रीचार्ज पे लेटर काय आहे? (What is freecharge pay later?)
ही फ्रीचार्जची एक क्रेडिट सुविधा आहे, यामाध्यमातून ग्राहकांना आता खरेदी करून नंतर पैसे भरण्याची सुविधा मिळेल. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना सुरुवातीला 5000 रुपयापर्यन्त क्रेडिट मिळू शकते. फ्रीचार्ज ॲपवर क्रेडिट ही सुविधा अॅक्सिस बँकेद्वारे चालवली जाते.
फ्रीचार्ज पे लेटर कसं करतं काम?
ही सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला पे लेटरवर जाव लागेल. नवीन असताना तुम्हाला दर महिन्याला 5 हजार रुपये क्रेडिट मर्यादा मिळेल. तुमच्या खर्चानुसार ही मर्यादा समोर वाढवली सुद्धा जावू शकते. या सेवेच्या माध्यमातून तुम्ही तुमचे छोटे मोठे खर्च भागवू शकता. याचे पेमेंट मोड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्ड किंवा कॅशची गरज भासणार नाही. ही सेवा वापरण्यासाठी कोणत्याही फीची आवश्यकता नाही. तुमच्याकडून घेणारे व्याजही तुम्हाला फ्रीचार्ज वॉलेटमधून परत दिले जाईल.
बिल कधी भरावे लागते?
तुम्ही खर्च केलेल्या वस्तुंचे बिल एकाच वेळी भरावा लागेल, त्यात कंपनी कोणतेही कंसेशन देत नाही. दर महिन्याच्या ठरलेल्या तारखेला तुम्हाला बिल भरावे लागेल, पेमेंट करायला जर उशीर झाला तर दिवसाला 10 रुपये आकरण्यात येते. फ्रीचार्ज सेवा सुद्धा तुमच्यासाठी बंद करण्यात येतात. लेट फी आकरण्यात येते. तुमचे क्रेडिटसुद्धा खराब होते.