• 28 Nov, 2022 16:42

YouTube च्या 'या' चॅनलवरुन तुम्ही शिकू शकता भन्नाट स्किल्स!

You Tube

काही वर्षांपूर्वी प्रत्येक गोष्टीचे क्लास लावावे लागत होते पण आता तुम्ही अधिकाधिक गोष्टी घर बसल्या शिकू शकता फक्त आणि फक्त यूट्यूबच्या माध्यमातून. स्वयंपाक किंवा इतर कला तर महत्वाच्या आहेच पण आयुष्यात सर्वात महत्त्वाच म्हणजे शिक्षण. यूट्यूबचे असे काही चॅनल आहेत जे तुम्हाला 4-वर्षांच्या पदवीपेक्षा अधिक कौशल्ये शिकवतील, त्याबद्दल माहित करून घ्या या लेखातून.

Youtube म्हटलं की छोट्या मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत प्रत्येकाला त्याचा छंद आहे. कोरोना काळात प्रत्येकाचे आयुष्य यूट्यूबशी अधिकच जुडले. एखाद काम अडकलं की लगेच उद्गार निघतात यूट्यूब वर बघ ना! कारण अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्ही YouTube वर सर्च केल्यास तुम्हाला मिळणार नाही. आईचा स्वयंपाक, बाबाचे ऑफिस वर्क, ताईचा अभ्यास, दादाच्या गर्लफ्रेंड पटवायच्या टिप्स हे सर्व आता यूट्यूबवरुन तुम्हाला मिळत आहे. 

कोरोंना काळात यूट्यूबचा वापर अधिकच वाढला. अनेकांनी रोजगारासाठी यूट्यूब चॅनल ओपन केले, त्यामुळे आता YouTube चे 50,934,583 पेक्षा जास्त चॅनल आहेत. यामध्ये सर्वच चॅनल तुमच्या उपयोगाचे आहेत. प्रत्येकाने एक एक  कंटेंट पकडून आपले यूट्यूब चॅनल सुरू केले आहेत. आपल्या दिवसाच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत आपण काय कोणत्या पद्धतीने केल पाहिजे हे सर्व तुम्हाला यूट्यूब चॅनल सांगत असत. काही वर्षांपूर्वी प्रत्येक गोष्टीचे क्लास लावावे लागत होते पण आता तुम्ही अधिकाधिक गोष्टी घर बसल्या शिकू शकता फक्त आणि फक्त यूट्यूबच्या माध्यमातून. स्वयंपाक किंवा इतर कला तर महत्वाच्या आहेच पण आयुष्यात सर्वात महत्त्वाच  म्हणजे शिक्षण. यूट्यूबचे असे काही चॅनल आहेत जे तुम्हाला 4-वर्षांच्या पदवीपेक्षा अधिक कौशल्ये शिकवतील. ते चॅनल पुढीलप्रमाणे, 

द स्कूल ऑफ लाइफ (The School of Life)

द स्कूल ऑफ लाइफ हे यूट्यूब चॅनल मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ (Psychologist, philosopher)आणि लेखकांचे (Authors) कलेक्शन आहे जे लोकांना हवे तसे जीवन जगण्यास मदत करते. या चॅनलचे 80.1 लाख Subscribers आणि 879 विडियो आहेत.

क्रॅशकोर्स (Crash course)

विविध विषयांवरील छोट्या आणि मनोरंजक शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दल संपूर्ण माहिती या चॅनलवर दिलेली आहे. या चॅनलचे 14.1 m Subscribers आणि 1451 विडियो आहेत. 

टेड ईडी (TED-ED)

विविध विषयांवर ॲनिमेटेड शैक्षणिक व्हिडिओ या चॅनलवर दिलेले आहेत. या चॅनलचे 17.8 m Subscribers आणि 1972 विडियो आहेत.

टॉक ऍट गुगल (Talk at Google)

कॉर्पोरेट इंटरव्ह्यू सीरीज स्पेसमध्ये  टॉक ऍट गुगल हे चॅनल अग्रेसर आहे, जे विचारवंतांना जगाला आकार देण्यासाठी प्रेरित करते. या चॅनलचे Subscribers 1.92 m आहेत आणि 5304 विडियो आहेत.  

प्रॅक्टिकल इंजिनियरिंग  (Practical Engineering)

पायाभूत सुविधा आणि आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टींबाबत जाणून घेण्यासाठी हे चॅनल बेस्ट आहे. या चॅनलचे Subscribers 2. 96m आहेत आणि विडियो 149 आहेत.

फ्री कोड कॅम्प  (Free Code Camp)

मोफत कोड करायला शिका. वेब विकास आणि प्रोग्रामिंग ट्यूटोरियल. HTML, CSS, JavaScript, Python आणि बरेच काही या चॅनलवरुन तुम्ही माहित करू शकता. या चॅनलचे Subscribers 6.6 m आहेत आणि  1369 विडियो आहेत.