Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahila Bachat Gat: समृद्धी कर्ज योजनेचा 'असा' घेऊ शकता लाभ

Mahila Bachat Gat

Samriddhi Loan Scheme: महिला बचत गटांमार्फत अनेक कर्ज उपलब्ध करून दिले जातात. महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना सुरू आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

Mahila Bachat Gat: स्त्री पुरुष समानता (Equality of men and women) अजूनही काही भागात नावापुरतीच दिसून येते. स्त्रियांना दुय्यम दर्जा देणारी मंडळी अजूनही आहे. महिलांना पुढे आणण्यासाठी महिला बचत गटाचे फार मोठे योगदान आहे. महिलांच्या जीवनमानात अनेक बदल घडून आले, अजूनही त्यात भर पडत आहे. महिलांना सन्मानाने जगता यावे.  रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता बचत गटामार्फत महिलांना लोन उपलब्ध करून दिले जाते. त्यापैकी एक म्हणजे महिला बचत गट समृद्धी कर्ज (loan). या कर्जाचा लाभ घेऊन महिलांना व्यवसाय उभारणी करण्यास मदत होते. 

FEMALE SAVINGS GROUP (1)

महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेचे उद्देश 

  • महाराष्ट्रातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश
  • आर्थिक विकासासोबतच सामाजिक विकास करणे
  • महिलांना स्वयंरोजगार मिळणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ करणे
  • महिलांचे जीवनमान सुधारणे
  • महिला लघुउद्योगांना (Small scale industries) प्रोत्साहन देणे
  • होतकरू व कष्टाळू महिलांना आत्मनिर्भर बनवणे

योजनेचे लाभ, व्याजदर आणि पात्रता 

या योजनेचा लाभ फक्त राज्यातील महिला बचत गटातील सदस्यांनाच मिळतो, प्रामुख्याने महिलांनाच. या योजनेअंतर्गत चार टक्के व्याजदर लागू होतो. अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ निवासी असणे आवश्यक आहे. बचत गटात जास्तीत जास्त 20 महिला असतात. संपूर्ण महिला मिळून सुद्धा लोन घेऊ शकतात. वैयक्तिकरीत्या सुद्धा लोन घेता येऊ शकते. या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो. अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. 3 वर्षाच्या आत या कर्जाची परतफेड करावी लागते. 

योजनेच्या अटी

  • फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल 
  • कर्ज घेताना बचत गटाला स्थापन होऊन दोन वर्ष पूर्ण झालेली असावी
  • कर्ज घेतल्यापासून त्या कर्जाचा उपयोग चार महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे 
  • अर्जदार महिला बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे
  •  महिलेचे वय 18 ते 50 वर्ष या दरम्यान असावे
  • महिला दारिद्र्यरेषेखालील (Below poverty line) असणे आवश्यक आहे
  • खोटी माहिती देऊन जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यावर कारवाई होऊ शकते
  • कर्ज घेणाऱ्या महिलांच्या  बचत गटाच्या बँक खात्यात किमान दहा हजार रुपये शिल्लक असणे आवश्यक

योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • रहिवासी पुरावा 
  • जन्म प्रमाणपत्र 
  • उत्पन्नाचा  दाखला 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 
  • बँकेचा डिटेल्स 
  • पासपोर्ट साईज फोटो
  • व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक

कर्जाचे फायदे 

  • लघुउद्योगाला प्रोत्साहन मिळते. 
  • महिलांना रोजगार प्राप्त होते. 
  • महिला आत्मनिर्भर बनून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. 
  • महिलांची आर्थिक समज वाढून निर्णय घेण्याचे सामर्थ्य निर्माण होते. 
  • महिलांचे व्यवसायातील नॉलेज वाढते.