YES Bank hikes FD interest rates: येस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. नव्या दरानुसार सर्वसामान्य नागरिक 7.5% पर्यंत तर ज्येष्ठ नागरिक 8% पर्यंत व्याजदर मिळू शकतात. कमी जोखमीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे. निश्चित कालावधीच्या FD वरील दर 25 ते 50 बेसिस पॉइंटने वाढवण्यात आले आहेत. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या FD वर साठी हे नवे दर लागू असतील.
बँकेने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारीपासून नवे दर लागू झाले आहेत. नव्या दरानुसार आता 181 ते 271 दिवसांच्या मुदत ठेवींवर 6% व्याजदर मिळेल. याआधी हा दर 5.75% इतका होता. 272 दिवस ते 1 वर्ष कालावधीतील मुदत ठेवींवरील व्याजदर 6.25% इतका केला आहे. याआधी हा दर 6% होता. तर 1 वर्ष ते 15 महिने कालावधीतील FD वर आता 7.25% व्याजदर मिळणार आहे, यापूर्वी हा दर 7% होता.
| कालावधी | सर्वसामान्य नागरिकांसाठी व्याजदर | ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर | 
| 7 दिवस ते 14 दिवस | 3.25% | 3.75% | 
| 15 दिवस ते 45 दिवस | 3.70% | 4.20% | 
| 46 दिवस ते 90 दिवस | 4.10% | 4.60% | 
| 91 दिवस ते 180 दिवस | 4.75% | 5.25% | 
| 181 दिवस ते 271 दिवस | 6.00% | 6.50% | 
| 272 days to < 1 year | 6.25% | 6.75% | 
| 1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी | 7.25% | 7.75% | 
| 15 महिने ते 35 महिन्यांपेक्षा कमी | 7.50% | 8.00% | 
| 35 महिने 1 दिवस ते 36 महिन्यांपेक्षा कमी | 7.50% | 8.00% | 
| 36 महिने ते 120 महिने किंवा त्यापेक्षा कमी | 7.00% | 7.75% | 
सर्वसामान्य नागरिकांसाठी FD चा दर काय असेल?(Yes bank FD rate for general public)
सर्वसामान्य नागरिकांसाठी 15 महिने ते 36 महिन्यांच्या मुदत ठेवींवर नव्या दरानुसार 7.5% व्याजदर मिळेल. याआधी हा दर 7% इतका होता. 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर 3.25% तर 15 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3.7% दर मिळेल. 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.1% व्याजदर मिळेल. तर 91 दिवस ते 180 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.75% व्याजदर मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर (Yes Bank FD rates for senior citizen)
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींच्या व्याजदरात 25 ते 50 bps ने वाढ केली आहे. 181 दिवस ते 271 दिवसांच्या कालावधीत मुदत ठेवींवर 6.50 टक्के व्याज मिळेल. यापूर्वी तो 6.25 टक्के होता. नव्या दरानुसार, 272 दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50% वरून 6.75% केले आहे. (YES Bank FD rate for senior citizen) येस बँकेने 1 वर्ष ते 15 महिने मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर 7.5 टक्क्यांवरून 7.75 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
ज्येष्ठ नागरिक 15 महिने आणि 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींसाठी 8% व्याजदर मिळेल. तर 36 महिने ते 120 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 7.75 टक्के व्याज मिळेल.
7 दिवस ते 14 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींसाठी, ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के व्याज मिळेल. येस बँक 15 दिवस ते 45 दिवसांच्या दरम्यान मॅच्युअर होणाऱ्या एफडीसाठी 4.20 टक्के व्याजदर देईल. बँक 46 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीतील ठेवींसाठी 4.6 टक्के व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांना 91 दिवस ते 180 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी 5.25 टक्के व्याजदर मिळेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            