दुचाकींच्या बाजारपेठेत यामाहाकडून लवकरच Yamaha RX 100 ही मोटारसायकल एंट्री घेणार आहे. कंपनीने Yamaha RX 100 ला पुन्हा लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन Yamaha RX 100 ही 300 सीसी किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या इंजिनासह असेल, असे कंपनीने म्हटलं आहे. त्यामुळे Yamaha RX 100 बाइक पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर धडाडणार आहे.
ऐंशीच्या दशकात तरुणाईमध्ये Yamaha RX 100 प्रचंड लोकप्रिय होती. जवळपास दोन दशके Yamaha RX 100 ची ओळख ही वेगवान बाइक म्हणून होती. मात्र काही वर्षांपूर्वी कंपनीने या मोटारसायकलीचे उत्पादन बंद केले होते. आता पुन्हा नव्या स्वरुपात आणि जास्त शक्तिशाली इंजिनासह Yamaha RX 100 बाजारात सादर केली जाणार आहे.
क्लासिक Yamaha RX 100 या बाइकला पुन्हा बाजारात लॉंच करण्यासाठी कंपनी जोरदार तयारी करत आहे. यामाहा प्रेमींसाठी Yamaha RX 100 चे नवे मॉडेल लवकर बाजारात दाखल करु असे यामाहा इंडियाचे अध्यक्ष इशिन चिहाना यांनी सांगितले. Yamaha RX 100 च्या रिलॉंचिंगबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडून केलेली ही पहिलीच अधिकृत घोषणा आहे.
Yamaha RX 100 ची जागा कोणी घेऊ शकत नाही. या बाइकबाबत आजही खूप क्रेझ आहे, असे चिहाना यांनी सांगितले. मात्र BS6 नियमावलीमुळे कंपनी Yamaha RX 100 चे 2 स्ट्रोक इंजिनचे मॉडेल बाजारात पुन्हा लॉंच करु शकत नाही. त्याऐवजी अधिक शक्तिशाली इंजिनाचा पर्याय तपासला जात असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. Yamaha RX 100 मध्ये पूर्वी 150 ते 200 सीसी क्षमतेचे इंजिन होते. आता नव्याने दाखल होणाऱ्या Yamaha RX 100 मध्ये 300 सीसी क्षमतेचे इंजिन असण्याची शक्यता आहे.