भारताचा स्वातंत्र्यदिन काही दिवसांवर येऊन ठेपलाय. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वेगवगेळ्या कंपन्या. ई-कॉमर्स वेबसाइट आपल्या ग्राहकांना आकर्षक अशा ऑफर्स देत असतात. अमेझॉन आणि फ्लिपकार्टचा सेल जाहीर झाल्यानंतर आता झाओमीने देखील Xiaomi Independence Day Sale नावाने एका नव्या सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना झाओमीचे स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही दमदार सवलतीत खरेदी करता येणार आहेत.
कधीपासून सुरु होणार सेल?
Xiaomi ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच ऑगस्टपासून हा सेल लाइव्ह असेल. झाओमीची उत्पादने ग्राहकांना Xiaomi India च्या अधिकृत वेबसाइटवर खरेदी करता येणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ICICI बँक क्रेडिट कार्डधारक ग्राहकांना स्पेशल सवलत दिली जाणार आहे. हफ्त्यावर मोबाईल खरेदी किंवा टीव्ही खरेदी केल्यास ग्राहकांना तब्बल 8 हजारांपर्यंत इन्स्टंट डिस्काऊंट दिला जाणार आहे. एवढंच नाही तर Xiaomi MobikWik Wallet वापरकर्त्यांनी खरेदी केल्यास त्यांना एकूण बिलाच्या 20% पर्यंत कॅशबॅक देखील दिला जाणार आहे.
काय मग? आहे की नाही ही खुशखबर? तुम्ही देखील नवा स्मार्टफोन किंवा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही संधी सोडू नका. कारण बाजार भावापेक्षा स्वस्त किमतीत तुम्हांला झाओमीचे ब्रांडेड उत्पादने खरेदी करता येणार आहेत.
Celebrate Freedom with our BIG #IndependenceDay Sale!
— Xiaomi India (@XiaomiIndia) August 3, 2023
Unleash the joy of saving with massive discounts on all your favorite products.
Sale starts tomorrow!
Stay tuned: https://t.co/8zn68W32Di pic.twitter.com/vGoCfpgzbU
Xiaomi स्मार्ट टीव्ही ऑफर!
झाओमीच्या स्मार्ट टीव्हीला भारतीयांची मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षात झाओमीची उत्पादने भारतीयांच्या घराघरात पोहोचली आहेत. Xiaomi Smart TV 5A Pro (32-इंच) Rs.13,999 मध्ये उपलब्ध आहे, ज्याची MRP 25,999 रुपये इतकी आहे. तसेच खरेदीवर ग्राहकांना 1 हजाराचा स्पेशल डिस्काऊंट देखील दिला जाणार आहे. इतरही स्मार्ट टीव्हीवर अशीच दमदार सूट दिली जात आहे.
Xiaomi स्मार्ट फोन ऑफर!
19,999 रुपये किमतीचा Redmi Note 12 5G स्मार्ट फोन ग्राहकांना केवळ .16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तसेच ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 2,000 रुपयांची इन्स्टंट सूट देखील दिली जाणार आहे.
सोबतच 31,999 रुपयांचा Redmi Note 12 Pro 5G हा स्मार्ट फोन ग्राहक केवळ 26,999 रुपयांना खरेदी करू शकणार आहेत आणि ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 3,000 रुपयांची इन्स्टंट सूट देखील दिली जाणार आहे.
एवढंच नाही तर Xiaomi 12 Pro 5G हा स्पेशल फीचर्स असलेला हाय स्पेसिफिकेशन असलेला स्मार्ट फोन ग्राहकांना फक्त 44,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे, ज्याची किंमत 84,999 रुपये इतकी आहे. या मोबाईल खरेदीवर ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 2,000 रुपयांची इन्स्टंट सूट देखील दिली जाणार आहे.