चिनी टेक कंपनी Xiaomi ने 26 फेब्रुवारीरोजी बार्सिलोनामध्ये सुरू झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2023 इव्हेंटमध्ये Xiaomi 13 सिरीज मोबाईल लाँच केले आहेत. या सिरीजमध्ये कंपनीने जागतिक बाजारपेठेसाठी तीन 5G स्मार्टफोन सादर केले आहेत. यामध्ये Xiaomi 13, Xiaomi 13 Pro, Xiaomi 13 Lite या मोबाईल फोन्सचा समावेश आहे.
Xiaomi 13 Pro हा मोबाईल पहिल्यांदा डिसेंबर 2022 मध्ये चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि आता भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी लॉन्च करण्यात आला आहे.या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 8th जनरेशन 2 प्रोसेसरसह ग्राहकांना मिळणार आहे. तसेच सिरॅमिक व्हाइट आणि सिरॅमिक ब्लॅक कलर पर्यायांमध्ये हा हँडसेट उपलब्ध असणार आहे. हा हँडसेट 162.9 × 74.6 x 8.38 मिमी या आकाराचा आहे आणि त्याचे वजन 229 ग्रॅम इतके आहे. चला जाणून घेऊया फ्लॅगशिप फोनचे स्पेसिफिकेशन्स...
Xiaomi 13 Series launches globally, Xiaomi 13 Pro debuts in India#Xiaomi13Series #Xiaomi13Pro #Xiaomi pic.twitter.com/YbJrIfjeTt
— Smartprix (@Smartprix) February 27, 2023
Xiaomi 13 Pro: किंमत आणि उपलब्धता
Xiaomi 13 ची किंमत युरो 999 (अंदाजे रु. 87,585) पासून सुरू होते आणि Xiaomi 13 Pro ची सुरुवात युरो 1,299 (अंदाजे रु. 1,13,887) पासून होते. तर, Xiaomi 13 Lite ची किंमत 499 युरोपासून सुरू होते. भारतात Xiaomi 13 Pro ची किंमत 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता जाहीर केली जाणार आहे. हा 5G स्मार्टफोन भारतीय खरेदीदारांसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर उपलब्ध असेल.
Xiaomi 13 Pro स्पेसिफिकेशन
Xiaomi 13 Pro मध्ये 3200 x 1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.73-इंचाचा क्वाड HD+ डिस्प्ले आहे. ही स्क्रीन E6 AMOLED पॅनेलवर बनवली आहे जी 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. 1900 nits ब्राइटनेस आणि 1920 Hz PWM dimming सारखी वैशिष्ट्ये देखील डिस्प्लेमध्ये उपलब्ध आहेत. Xiaomi 13 Pro इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसद्वारे संरक्षित आहे.
Xiaomi 13 Series Official Teaser!#dotsm #Xiaomi13Pro #mi #Xiaomi13Series #miui14 pic.twitter.com/KVLZR5xkZ0
— Dot SM (@dot_sm_) February 24, 2023
फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये F/1.9 अपर्चरसह 50MP Sony IMX989 सेन्सर, F/2.2 अपर्चरसह 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि F/2.0 अपर्चरसह 50MP टेलिफोटो लेन्स समाविष्ट आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, Xiaomi 13 Pro F/2.0 अपर्चरसह 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Xiaomi च्या या स्मार्टफोनमध्ये उच्च दर्जाची Leica लेन्स वापरण्यात आली आहे. कंपनीने प्राथमिक कॅमेरावर Leica Vario-Summicron लेन्स (23mm) सेंसर दिला आहे जो अधिक स्थिर फोटोंसाठी Hyper OIS सह दिला जातो. फोनचे मागील तीनही कॅमेरे नाईट मोडमध्ये पोर्ट्रेटला सपोर्ट करतात. 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील या कॅमेर्याने करता येणार आहे.
Qualcomm Snapdragon 8 Generation 2 प्रोसेसर आणि 12GB RAM + 256GB इनबिल्ट स्टोरेज फोनमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर Xiaomi 13 Pro मध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 740 GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन LPPDDR5x RAM आणि UFS 4.0 स्टोरेज तंत्रज्ञानावर काम करतो. हेवी गेमिंग सुलभ करण्यासाठी या फोनमध्ये अल्ट्रा लार्ज लिक्विड कूल व्हीसी तंत्रज्ञान देण्यात आले आहे. स्मार्टफोनला Android 13 वर आधारित MIUI 14 कस्टम स्किन सपोर्ट मिळेल. हा Xiaomi चा नवीनतम आणि प्रगत वापरकर्ता इंटरफेस आहे.
Yhteistyössä Leica Cameran kanssa kehitetty #Xiaomi13Series -älypuhelinsarja on täällä.
— Xiaomi Suomi (@XiaomiSuomi) February 27, 2023
Xiaomi 13 Series on ennakkotilattavissa Suomessa tänään 27. helmikuuta alkaen. Katso lähin jälleenmyyjäsi osoitteesta https://t.co/sdISB8zIjw. #Xiaomi13Series #BehindTheMasterpiece pic.twitter.com/gWugstU1kn
हा स्मार्टफोन 1.5 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटांपर्यंत सुरक्षित राहू शकतो. Xiaomi 13 Pro 120W जलद आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,820 mAh बॅटरी पॅक प्रदान करतो.फोनमधील कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, 4G LTI, Wi-Fi 6, USB Type-C पोर्ट, Bluetooth 5.3, NFC, GPS, NFC आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट असेल.