रेसलिंग जगतातली मोठी कंपनी असलेल्या वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटची विक्री झालीय. एंडेव्हर ग्रुपनं (Endeavour) ती विकत घेतली असून तिच्याकडे नवीन कंपनीची 51 टक्के मालकी असणार आहे. तर डब्ल्यूडब्ल्यूईचे (World Wrestling Entertainment) भागधारक नवीन कंपनीचे 49 टक्के मालक असणार आहेत. या करारात डब्ल्यूडब्ल्यूईचं मूल्य 9.3 अब्ज डॉलर तर यूएफसीचं मूल्य 12.1 बिलियन डॉलर आहे. विलीन झालेल्या कंपनीचं नाव लवकरच घोषित केलं जाईल. नियामक मंडळात 11 लोक असतील. त्यापैकी सहा एन्डेव्हर आणि पाच जणांना डब्ल्यूडब्ल्यूईद्वारे नियुक्त केलं जाईल.
Table of contents [Show]
एरी इमॅन्युएल मुख्य कार्यकारी अधिकारी
एरी इमॅन्युएल हे एंडेव्हर आणि नवीन कंपनीचे मुख्य कार्यकारी म्हणून काम करतील. ते सध्या एंडेव्हरचे सीईओ आहेत. यासह विन्स मॅकमोहन कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. डाना व्हाईट हे यूएफसीचे अध्यक्ष राहतील. डब्ल्यूडब्ल्यूईचे सीईओ निक खान हे कुस्ती व्यवसायाचे अध्यक्ष राहणार आहेत. विलीन केलेली कंपनी जगातल्या दोन सर्वात मोठ्या स्पोर्ट्स एंटरटेनमेंट ब्रँड्सना एकत्र आणणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्यांच्या कार्यपद्धती आणि संस्कृतीत मोठा फरक आहे. मात्र तरीदेखील या दोन जागतिक दर्जाच्या कंपन्या एकत्र येत आहेत. यूएफसीमध्ये प्रामाणिकपणे क्रूर मिक्स्ड मार्शल आर्ट मारामारीची वैशिष्ट्यं आहेत तर डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये स्क्रिप्टेड सामने आणि सोप ऑपेरासारखे प्रकार आहेत.
In which @Nick_Hausman asks Roman Reigns and Paul Heyman about today's WWE/UFC merger reports and the #WrestleMania press conference nearly falls off the rails. pic.twitter.com/3BLHyLXNTo
— David Bixenspan (@davidbix) April 3, 2023
खरेदीदाराच्या शोधात होती कंपनी
कॅलिफोर्नियात डब्ल्यूडब्ल्यूईचा मुख्य लाइव्ह इव्हेंट रेसलमेनिया होता. या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी विलीनीकरणाच्या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अनेक महिन्यांपासून कंपनी खरेदीदाराच्या शोधात होती. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी मॅकमोहन जानेवारीमध्येच अध्यक्ष म्हणून परतले होते. या वर्षी डब्ल्यूडब्ल्यूईच्या शेअर्समध्ये 33 टक्क्यांहून अधिक वाढ झालीय. त्यानंतर कंपनीचं बाजार मूल्य 6.79 बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाल्याचं समोर आलंय.
कौटुंबिक व्यवसाय संपुष्टात
या विलीनीकरणानंतर डब्ल्यूडब्ल्यूईमधला कौटुंबिक व्यवसाय संपुष्टात येणार आहे. या कंपनीची स्थापना मॅकमोहन यांच्या वडिलांनी 20व्या शतकाच्या मध्यात केली होती. तर गेल्या 40 वर्षांपासून डब्ल्यूडब्ल्यूईने जागतिक स्तरावर आपला बोलबाला निर्माण केला. कंपनीनं हल्क होगन, ड्वेन द रॉक जॉन्सन, रिक फ्लेअर, बॅटिस्टा आणि जॉन सीना यांच्यासारखे मजबूत खेळाडू तयार केले आहेत. या विलीनीकरणामुळे दोन्ही कंपन्यांच्या भागधारकांना चांगलंच बळ मिळालंय. आपल्याच 1 बिलियन डॉलर मीडिया युनिटद्वारे डब्ल्यूडब्ल्यूईनं मागच्या वर्षी 1.29 बिलियन डॉलरची कमाई केली.दुसरीकडे यूएफसीनं गेल्या वर्षी 1.3 अब्ज डॉलरची कमाई केली.
Vince McMahon bought the WWE from his father for $1 Million in 1982
— Savvy Trader (@SavvyTrader) April 3, 2023
Today he signed a merger deal with UFC parent company Endeavor Group $EDR that values the $WWE at $9.3 Billion pic.twitter.com/AwCpuQvTRw
कामाची पद्धत अत्यंत खडत
एंडेव्हर, यूएफसी आणि डब्ल्यूडब्ल्यूई या कंपन्या वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची कामाची पद्धत अत्यंत खडतर अशीच आहे. मॅकमोहन, इमॅन्युएल आणि व्हाईट ही या कंपन्यांमधली मोठी व्यक्तीमत्वे आहेत. या तिघांसोबत ज्याप्रमाणे भागीदार आहेत त्याचप्रमाणे कठोर टीकाकारदेखील आहेत. एका घोटाळ्यात व्हाईट यांचं नाव या वर्षाच्या सुरुवातीला आलं होतं. मॅक्सिकोतला एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक पार्टी झाली होती, त्या सार्वजनिक पार्टीत वाद झाला त्यांनी आपल्या पत्नीच्या कानशिलात लगावली. अर्थात नंतर माफीही मागितली मात्र या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती.