Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fuel Credit Cards: पेट्रोल- डिझेलच्या किमतींने चिंतेत आहात? क्रेडिट कार्ड बनवा, स्वस्तात इंधन मिळवा!

Credit Card

इंधन क्रेडिट कार्डच्या (Fuel Credit Cards) मदतीने तुम्ही इंधन खर्चात बचत करू शकता. तसेच तुम्हाला इंधन खरेदीवर अतिरिक्त रिवॉर्ड पॉईंट्स (Reward Points) किंवा कॅशबॅक (Cashback) देतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इंधन क्रेडिट कार्डची मागणी वाढली आहे. वेगवेगळ्या बँका किंवा क्रेडिट कार्ड कंपन्या त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारची कार्ड्स देतात, जी ग्राहकांच्या एकूण खर्चावर आणि आर्थिक शिस्तीवर आधारित असतात. इंधन क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही इंधन खर्चात बचत करू शकता. तसेच तुम्हाला इंधन खरेदीवर अतिरिक्त रिवॉर्ड पॉईंट्स (Reward Points) किंवा कॅशबॅक (Cashback) देतात.

इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्ड (Indian Citi Credit Card)

इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डद्वारे इंधनाचे पैसे भरल्यास
, तुम्ही एका वर्षात 68 लिटर पेट्रोल-डिझेल मोफत मिळवू शकता. हे क्रेडिट कार्ड इंधन खरेदीसाठी उत्तम कार्ड आहे. या कार्डद्वारे इंडियन ऑइलच्या (Indian Oil)  पंपांवरून इंधन खरेदी करण्यासाठी बक्षिस स्वरूपात अनेक फायदे आहेत. हे रिवॉर्ड पॉइंट्स (टर्बो पॉइंट्स) कधीही कालबाह्य होत नाहीत. इंडियन ऑइल पंपांवर खर्च केलेल्या प्रत्येक 150 रुपयांसाठी 4 टर्बो पॉइंट मिळतात. हे पॉइंट रिडीम करून, ग्राहकांना वार्षिक 68 लिटरपर्यंत मोफत इंधन मिळू शकते.

इंडियन ऑईल एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड (Indian Oil HDFC Bank Credit Card)

इंडियन ऑईल एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डसह, ग्राहक BPCL आउटलेटवर 'फ्यूल पॉइंट्स' (Fuel Ponits) नावाचे रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकतात. या कार्डद्वारे तुम्ही इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेमेंट कराल तर तुम्हाला खर्चाच्या 5 टक्के इंधन पॉइंट्स मिळतील. इंधन पॉइंट्सची पूर्तता करून, ग्राहक वार्षिक 50 लिटर इंधन मिळवू शकतात.

बीपीसीएल एसबीआय कार्ड ओक्टेन (BPCL SBI Card OCTANE)

SBI कार्ड वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कार्ड BPCL पेट्रोल पंप स्टेशनवर खर्च केलेल्या इंधन आणि वंगणांवर (Lubricant) 7.25 टक्के कॅशबॅक (1 टक्के अधिभार माफीसह) आणि भारत गॅसच्या खर्चावर 6.25 टक्के कॅशबॅक ऑफर ग्राहकाला मिळेल.

सुपर व्हॅल्यू टायटॅनियम क्रेडिट कार्ड (Super Value Titanium Credit Card) 

स्टँडर्ड चार्टर्ड सुपर व्हॅल्यू टायटॅनियम क्रेडिट कार्डद्वारे, पेट्रोल पंप स्टेशनवर खर्च केलेल्या इंधनावर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. परंतु, यासाठीचा खर्च 2000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावा. या ऑफरद्वारे, एका महिन्यात जास्तीत जास्त 200 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. एका व्यवहारात जास्तीत जास्त 100 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो.

युनि कार्बन क्रेडिट कार्ड (Union Carbon Credit Card) 

'युनि कार्बन क्रेडिट कार्ड' द्वारे, 4% कॅशबॅक (1% सरचार्ज माफीसह) HPCL पेट्रोल पंप स्टेशनवर खर्च केल्यास आणि HP वॉलेटवर खर्च केल्यावर ग्राहकांना 1.50% कॅशबॅक मिळेल.

इंडियन ऑइल एक्सिस बँक क्रेडिट कार्ड (IndianOil Axis Bank Credit Card)

इंडियन ऑइल एक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे, तुम्हाला इंडियन ऑइल पंपांवर खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांवर 20 रिवॉर्ड पॉइंट (4% व्हॅल्यूबॅक) मिळतील.