Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Saving Tips: नवीन आर्थिक वर्षात घरून काम करताय; मग या टॅक्स बचतीच्या टिप्स नक्की जाणून घ्या

Tax Deductions for Home Office Expenses

Tax Deductions for Home Office Expenses: तुम्ही स्वत:चा व्यवसाय किंवा एखादा रोजगार करत असाल किंवा घरातूनच ऑफिसचे काम करत असाल किंवा फ्री-लान्सर म्हणून काम करत असाल तर तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही कामावर होणारा खर्च वजा करून टॅक्स वाचवू शकता. या तरतुदीमध्ये काय आहेत, हे आपण पाहणार आहोत.

Tax Deductions for Home Office Expenses: तुम्ही घरून काम करता त्यामुळे तुम्हाला पगारदार व्यक्तीप्रमाणे  फॉर्म-16 मिळत नाही किंवा पगाराची स्लिपसुद्धा मिळत नाही. मग टॅक्स सवलतीच्या तरतुदी कशा मिळवायच्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तुम्ही मुळीच चिंता करू नका. कायद्यातील तरतुदीनुसार तुम्ही नक्कीच टॅक्समध्ये सवलत मिळवू शकता. जर तुम्ही घरून काम करत असाल किंवा घरच तुमचे ऑफिस असेल तर तुम्हाला टॅक्समधून काही प्रमाणात सवलत मिळवता येऊ शकते. ती कशी मिळवायची. त्यासाठी इन्कम टॅक्स कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत का? याची माहिती आपण घेणार आहोत.

तुम्ही स्वत:चा व्यवसाय किंवा एखादा रोजगार करत असाल किंवा घरातूनच ऑफिसचे काम करत असाल किंवा फ्री-लान्सर म्हणून काम करत असाल तर तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही कामावर होणारा खर्च वजा करून टॅक्स वाचवू शकता.या तरतुदींमध्ये काही मर्यादा आहेत. पण कायद्याच्या अधीन राहून आणि नियमांचे पालन करून तुम्ही टॅक्समध्ये नक्कीच सवलत मिळवू शकता. याव्यतिरिक्त इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C आणि कलम 80D अंतर्गत 1.50 लाखापर्यंत कर सवलत मिळवता येते.

घरून काम करताना कोणते खर्च लक्षात घेतले पाहिजेत?

जर तुम्ही घरून काम करत असाल, तर तुमच्या कामाशी संबंधित असणारे खर्च तुम्ही तुमच्या उत्पन्नातून वजा करू शकता. यामध्ये स्टेशनरीची बिले, जागा भाड्याने घेतली असेल तर त्याच्या भाड्याची पावती, विज बिले, स्टेशनरीवर होणारा खर्च यात समावेश होतो.

यातून काय-काय वजावट होऊ शकते?

जर तुम्ही सर्व्हिस आणि युटिलिटीचा वापर करत असाल, जसे की, ऑफिसच्या कामासाठी तुम्ही फोन वापरत असाल, तर त्याचे बिल तुम्ही उत्पन्नातून वजा करू शकता. ऑफिससाठी वापरली जाणारी स्टेशनरी आणि इतर साहित्याचा खर्च तुम्ही उत्पन्नातून वजा करू शकता. अशाचप्रकारे तुम्ही तुमचे राहते घर पूर्णत: ऑफिसच्या कामासाठी वापरत असाल तर त्यासाठी भरत असलेल्या भाड्याचा खर्च तुम्ही उत्पन्नातून वजा करू शकता.

वर्क फ्रॉम होम ऑफिसच्या खर्चाची वजावट कशी दाखवू शकतो?  

वर्क फ्रॉम होम किंवा घरातून केल्या जाणाऱ्या व्यवसायातील खर्च वेगवेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो. एक म्हणजे वर्क फ्रॉम होमद्वारे ऑफिसच्या कामावर होणाऱ्या खर्चाची बिले सबमिट करून तुम्ही तुमच्या उत्पन्नामधून ती वजा करू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या घरातील एकूण जागेपैकी जितकी जागा तुम्ही कामासाठी वापरता, तेवढ्या जागेचे भाडे तुम्ही तुमच्या उत्पन्नातून वजा करू शकता. यामध्ये इलेक्ट्रिसिटी, पाणी, टेलिफोनचे बिल अशा सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्याचबरोबर तुम्ही कामासाठी कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर किंवा इतर साधने वापरत असाल तर त्याची किंमत सुद्धा उत्पन्नातून वजा करू शकता.

अशाप्रकारे वर्क फ्रॉम ऑफिस किंवा घरातून काम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या उत्पन्नातून वर नमूद केलेले खर्च वजा करू शकतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न काही प्रमाणात टॅक्स स्लॅबच्याखाली येऊ शकते. त्याचबरोबर इन्कम टॅक्स कायद्यातील 80c, 80D या तरतुदींचा वापर करून 1.50 लाखापर्यंत सवलत मिळवता येऊ शकते.