Women IPL Team 2023: 25 जानेवारी, 2023 हा दिवस क्रिकेटमधील एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. कारण बीसीसीआयने आयोजित केलेल्या महिलांच्या T20 क्रिकेटच्या टीमसाठी लागलेल्या बोलीने पुरुषांच्या 2008 मधील आयपीएलचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. T20 आयपीएलमधील महिलांच्या 5 टीमसाठी एकूण 4670 कोटी रुपयांची बोली लागली. यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि लकनऊ या टीमचा सहभाग आहे.
2008 मध्ये आयपीएलच्या लीगसाठी लागलेल्या बोलीमध्ये 8 टीमसाठी 723.59 मिलिअन डॉलरमध्ये विक्री झाली होती. भारतीय रुपयांत याचे मूल्य अंदाजे 5905 कोटी रुपये एवढे होते. 2008 मध्ये एका अमेरिकन डॉलरची किंमत 44 रुपये होती. ती आता 80 रुपयांपर्यत पोहोचली आहे. पण 44 रुपयांप्रमाणे हिशोब केला तर 2008 मध्ये पुरुषांची आयपीएलची टीम 3185 कोटींमध्ये विकली गेलो होती. बीसीसीआयचे जनरल सेक्रेटरी जय शाह यांनी याबाबत ट्विट केले असून त्यांनी त्यात Historic Day असा उल्लेख केला आहे. महिलांच्या आयपीएल टीमने 2008 मधील पुरुषांच्या टीमचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचे म्हटले. याचबरोबर महिला क्रिकेटमधील ही क्रांतीची सुरूवात असल्याचेही त्यांनी म्हटले.
अदानी ग्रुपची सर्वाधिक बोली
अदानी ग्रुपने महिलांच्या आयपीएल टीमसाठी सर्वाधिक म्हणजे 1,289 कोटी रुपयांची बोली लावली. ही बोली एका टीमसाठी 10 वर्षांसाठी असणार आहे. याशिवाय मुंबई इंडियने 912.99 कोटी रुपये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 901 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटलने 810 कोटी रुपये आणि कॅप्रीने 757 कोटी रुपयांची बोली लावली.