Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC तक्रार करणे महिलेला पडलं महागात, अकाऊंटमधून गायब झाले 64 हजार रुपये

IRCTC

सोशल मीडियावर तुमचा थोडासा निष्काळजीपणा देखील तुमचे खूप नुकसान करू शकतो. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे, ज्यामध्ये एका महिलेला RAC तिकिटाचे तपशील सोशल मीडियावर शेअर करण्यास भाग पाडले गेले आणि तिच्या खात्यातून 64 हजार रुपये लंपास केले गेले.

सोशल मीडियावर तुमचा थोडासा निष्काळजीपणा देखील तुमचे खूप नुकसान करू शकतो. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे, ज्यामध्ये एका महिलेला RAC तिकिटाचे तपशील सोशल मीडियावर शेअर करण्यास भाग पाडले गेले आणि तिच्या खात्यातून 64 हजार रुपये लंपास केले गेले. वास्तविक, महिलेने ट्विटरवर आयआरसीटीसीला टॅग करून तिकीटाचे डिटेल्स शेअर केले होते. ज्यामुळे भामटयांनी  महिलेच्या चुकीचा फायदा घेतला आणि 64 हजार रुपयांची फसवणूक केली.

असा आहे संपूर्ण विषय

बनावट ईमेल, एसएमएस किंवा लिंक्सद्वारे चोरी करणे आणि फसवणूक करणे ही स्कॅमर्सची एक नेहमीची पद्धत बनली आहे. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही थोडी चूक केली तर घोटाळेबाज तुमचे मोठे नुकसान करण्यात यशस्वी होतात. या महिलेसोबतही असेच घडले. फसवणूक झालेल्या महिलेचे नाव एमएन मीना असून ती मुंबईची रहिवासी आहे.

अलीकडेच मीना यांनी  14 जानेवारीसाठी IRCTC वेबसाइटवरून मुंबई ते भुजसाठी तीन तिकिटे बूक केली होती.  परंतु तिची तिकिटे आरएसी मिळाली. मीना यांनी तिकिटाच्या अपडेटबद्दल जाणून घेण्यासाठी आणि तिकीटाची चौकशी करण्यासाठी IRCTC ला टॅग करून तिचा फोन नंबर आणि रेल्वे तिकीट डिटेल्स ट्विट केले. घोटाळेबाजांनी त्याच्या चुकीचा फायदा घेत त्याची 64 हजार रुपयांची फसवणूक केली.

त्यांनी  फोन नंबर आणि रेल्वे तिकीट तपशील ट्विट करताच सायबर फ्रॉडने तिला कॉल केला. एका व्यक्तीने मीना यांना फोनवर आपण रेल्वेच्या वतीने बोलत असल्याचे सांगितले आणि त्यांची फसवणूक करून ओटीपीच्या मदतीने त्यांच्या  खात्यातून 64 हजार रुपये लंपास केले.

अशी झाली फसवणूक 

मीना यांच्याकडून सायबर घोटाळेबाजाने एक फॉर्म भरून घेतला.  ज्यामध्ये मीना यांच्या खात्याचा तपशील भरून सबमिट करण्यास सांगितले होते. त्यानंतर मीना यांनी   ओटीपी शेअर करताच त्यांच्या खात्यातून 64 हजार रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्यानंतर त्यांनी  सायबर क्राइममध्ये तक्रार दिली. याबबात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.