आयटी सेवा देणाऱ्या भारतातील विप्रो लिमिटेड कंपनीने 31 मार्च, 2022 रोजी चौथ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक 3.8 टक्क्यांनी वाढ नोंदवून 3,087 कोटी रुपयांची नोंद केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी 2972 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. विप्रो लिमिटेड कंपनी ही चौथ्या तिमाहीतील नफा घोषित करणाऱ्या भारतीय आयटी सेवा कंपन्यांमधील शेवटची कंपनी होती.
विप्रोचा महसूल 28 टक्क्यांनी वाढून 20 , 860 कोटी झाला आहे , जो गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत 16 , 245 कोटी होता. दरम्यान , आयटी सेवा ( IT Service) विभागाचा महसूल 2 , 721.7 दशलक्ष होता , जो 3.1 टक्क्यांनी वाढला आहे. या तिमाहीत कंपनीचे निव्वळ उत्पन्न 3090 कोटी होते , जे चौथ्या तिमाहीत 4 टक्क्यांनी आणि वार्षिक कालावधीत 3.9 टक्क्यांनी वाढले आहे. 30 जून, 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत आयटी सर्व्हिसमधून कंपनीला 2,748 ते 2,803 दशलक्ष महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
भारतातील आयटी क्षेत्रातील नावाजलेली कंपनी म्हणून परिचित असलेल्या विप्रो कंपनीच्या महसुलात यावेळी 3.9 टक्क्यांनी वाढ झाली. विप्रो कंपनीच्या अगोदर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ( TCS), इन्फोसिस लिमिटेड ( Infosys Ltd ) , आणिएचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेड ( HCL Technologies Ltd ) या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीतील नफ्याचे निकाल लागले होते. या कंपन्यांचे नफ्याचे उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा कमी होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा विप्रो कंपनीच्या चौथ्या तिमाही निकालावर होत्या. शुक्रवारी विप्रोकंपनीचाशेअर बीएसईवर 2.59 टक्क्यांनी घसरून 509 रुपयांवर बंद झाला.