Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wipro Fresher Salary: साडेसहा लाखांच्या पॅकेजवर सिलेक्ट केलं; पण 'विप्रो'कडून निम्म्या पगारावर फ्रेशर्सची बोळवण

Wipro Fresher Salary

Image Source : www.jobs.cybertecz.in.com

विप्रो कंपनीने 2022 मध्ये पासआऊट झालेल्या विद्यार्थ्यांची जॉबसाठी निवड केली होती. मात्र, या फ्रेशर्सला कामावर घेतले नव्हते. जेव्हा त्यांची ऑनबोर्डिंग म्हणजेच कामावर रुजू होण्याची वेळ आली तेव्हा मात्र, कंपनीने आपली पॉलीस बदलली. साडेसहा लाखांवर सिलेक्ट केलेल्या विद्यार्थ्यांना निम्म्या पगारावर काम करण्यासाठी पुन्हा ऑफर दिली.

Wipro Fresher Salary: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या मंदीत सापडल्या असून अनेक बड्या कंपन्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. बाजारातील अस्थिरता पाहत गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, अॅमेझॉनसह अनेक कंपन्यांनी नोकर कपात केली. तसेच नवीन नोकरभरती करताना कमी पगाराची ऑफर फ्रेशर्सला दिली जात आहे. भारतातील मोठी आयटी कंपनी विप्रोचाही खर्च कमी करण्यासाठी  (Wipro to delay onboarding) आटापीटा सुरू आहे. ज्या फ्रेशर्सला आधी जास्त पगाराची ऑफर दिली होती, त्या ऑफरच्या निम्म्या पगारावर काम करण्यासाठी सांगण्यात आले.

कामावर रुजू करण्याआधी ऑफर बदलली (Wipro cuts down salary)

विप्रो कंपनीने 2022 मध्ये पासआऊट झालेल्या विद्यार्थ्यांची जॉबसाठी निवड केली होती. मात्र, या फ्रेशर्सला कामावर घेतले नव्हते. जेव्हा त्यांची ऑनबोर्डिंग म्हणजेच कामावर रुजू होण्याची वेळ आली तेव्हा मात्र, कंपनीने आपली पॉलीस बदलली. सुरुवातीला निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना 6.5 लाखांचे पॅकेज ऑफर केले होते. जेव्हा रुजू होण्याची वेळ आली तेव्हा 3.5 लाख पॅकेजवर काम करू शकता का? अशी विचारणा केली. कंपनीने मागील वर्षी ऑगस्टपासून नवीन भरती रोखून धरली होती. मात्र, ऐनवेळी दिलेल्या ऑफरमध्ये बदल केल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला समोर जावे लागले.

निम्म्या पगारावर जॉइन होण्याची ऑफर (Wipro Fresher salary)

निम्म्याने पगार कमी ऑफर केल्याने काही विद्यार्थ्यांना धक्काच बसला. विप्रो कंपनीकडून विविध कॉलेजमध्ये रिक्रूटमेंट ड्राइव्ह घेण्यात येतात. त्याअंतर्गत या विद्यार्थ्यांना सिलेक्ट करण्यात आलं होते. कंपनीने विद्यार्थ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं आहे की, तुम्ही जर नवी ऑफर स्वीकारली तर जुनी ऑफर रद्द होईल. मात्र, जर तुम्ही नवी ऑफर स्वीकारली नाही तर तुम्हाला प्रतिक्षा करावी लागेल. रुजू होण्याच्या तारखेबाबत आम्ही काहीही आश्वासन देऊ शकत नाही. कारण बाजारातील स्थिती आणि आमच्या ग्राहकांची गरज (Wipro cuts down salary) यावर पुढील भरती अवलंबून असेल, असे कंपनीने म्हटले आहे. 

विप्रोकडून खर्च कमी करण्याचा प्रयत्न (Wipro tries to cut hiring cost)

जागतिक मंदीची शक्यता, रोडवलेलं उत्पन्न, व्यवसायातील मंदी यामुळे विप्रो कंपनीकडून खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फ्रेशर्सच्या निवडीसाठी कंपनीकडून एलिट आणि टर्बो असे दोन उपक्रम (Wipro hiring programmes) राबवले जातात. यातील एलिट उपक्रमानुसार 3.5 LPA वार्षिक पॅकेज दिले जाते. तर टर्बो उपक्रमाद्वारे 6.5 LPA पॅकेज दिले जाते. मात्र, यावेळी जास्त पगार ऑफर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना निम्म्या पगारावर काम करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विप्रो कंपनीने निवड केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुरू असताना कामावरून काढून टाकले होते. खराब कामगिरीमुळे 452 कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरुन कमी केले होते. याबाबतही माध्यमांतून वृत्त आले होते. आता कंपनीने निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची ऑफर अचानकपणे बदलून फ्रेशर्सला धक्का दिला आहे.