Wimbledon 2022 : ‘विम्बल्डन 2022’ टेनिस स्पर्धा 27 जून ते 10 जुलै या दरम्यान होणार आहे. लंडन शहरातील ऑल-इंग्लंड लॉन टेनिस क्लबमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या जगप्रसिद्ध स्पर्धेचे डायरेक्टर जेमी बेकर (Wimbledon Tournament Director, Jamie Baker) असणार असून स्पर्धेची एकूण बक्षिसांची रक्कम 47,000,000 युरो इतकी असणार आहे. अमेरिक डॉलरमध्ये याचे मूल्य 4,96,37,640.00 डॉलर इतकं, तर भारतीय चलनात याची किंमत 3,88,42,69,424.10 रूपये इतकी आहे.
विम्बल्डन 2022 च्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 8 वेळा विजेता ठरलेला रॉजर फेडरर असणार नाही. याशिवाय डॅनिल मेदवेदेव, आंद्रे रुबलेव्ह, डारिया कासात्किना, अनास्तासिया पावल्युचेन्कोवा, आरीना सबालेन्का आणि व्हिक्टोरिया अझारेंका हे खेळाडू सुद्धा या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. कारण आयोजकांनी रशिया किंवा बेलारूसच्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी न करण्याचा निर्णय घेतला.
तिकीटं विकत कशी घ्यायची?
विम्बल्डन टेनिस स्पर्धेमध्ये सहभागी होणारे iOS आणि Android वर अधिकृत Wimbledon Mobile Apps द्वारे तिकीटं बूक करू शकतात. याशिवाय लंडनमध्ये उपस्थित असलेले चाहते रांग लावून ऑन-डे सुद्धा विकत घेऊ शकता. विम्बल्डनची तिकीटं दुसऱ्याला देता येत नाही; किंवा इतरांना भेट म्हणूनही देता येत नाहीत. ज्याच्या नावाने हे तिकीट काढले आहे. त्यालाच या स्पर्धेला उपस्थित राहता येते. उपस्थित राहता न येणाऱ्या तिकीट धारकाला रिफंड मिळण्याची सोय यात उपलब्ध आहे.
तिकीटांची किंमत काय?
विम्बल्डन 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी तिकीटांच्या किमतींमध्ये खूप फरक आहे. या तिकीटांची किंमत सामन्यानुसार, खेळाडुंनुसार आणि टेनिस कोर्टमधील जागेनुसार बदलते. मोठ्या प्रमाणात बदलतात. सामन्याचे महत्त्व आणि कोर्टवरील स्थानानुसार किंमत बदलते. सेंट्रल कोर्टवर खेळ पाहण्यासाठी एका तिकीटाची किंमत 70 युरोपासून (5,782 रूपये) सुरू होते, तर फायनल मॅचच्या तिकीटाची किंमत 240 युरो (19,826 रूपये) इतकी आहे. ग्राऊंड पासवरील तिकीटांची किंमत सर्वांत स्वस्त 27 (2,230 रूपये) युरो इतकी आहे. फायनल मॅचचे ग्राऊंड पासचे तिकीट अवघ्या 8 युरोचं (660 रूपये) आहे.
image source - https://bit.ly/3nfepJF