Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tur Rate: तुरीचे दर टिकून राहतील का? माहित करून घ्या

Tur Rate

Tur Rate: मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तुरीची लागवड कमी आहे. पावसामुळे काही प्रमाणात तुरीचे नुकसानही झाले आहे. डिसेंबरमध्ये तुरदाण्यांनी भरून जात असे परंतु काही भागत अजूनही तुर दाणे भरण्याच्या स्थितीत आहे.

Tur Rate: देशातील बाजारात सध्या कापसाच्या भावात घसरण (Fall in cotton prices) झाली आहे. अशातच तुरीची आवक बाजारात होऊ लागली आहे. सध्या तुरीचे दर समाधानकारक आहेत. शेतकऱ्यांना आशा आहे की तुरीचे दर आगामी काळातही टिकून राहतील. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तुरीची लागवड कमी आहे. पावसामुळे काही प्रमाणात तुरीचे नुकसानही झाले आहे. डिसेंबरमध्ये तुर दाण्यांनी भरून जात असे परंतु काही भागात अजूनही तुर दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. 

सध्याचे तुरीचे दर (Current Tur rates)

देशातील बाजारात सध्या तुरीचे दर 6800 ते 7400 प्रती क्विंटल असे आहे. जुन्या तुरीचे दर 7000 ते 7700 असे आहे. आवक कमी आणि मागणी जास्त (Inflows are low and demand is high) असल्याने दर स्थिर राहतील असे सांगितले जात आहे. सध्या तुरीचे दर समाधानकारक आहेत. भारतात परदेशातून तूर खरेदी करण्यात आली, आफ्रिका आणि म्यानमार (Africa and Myanmar) येथून तुर खरेदी केल्याने त्या देशात तुरीची उपलब्धता कमी आहे. 

तुरीच्या दरात तेजी कायम राहील का? (Will Tur prices continue to rise?)

नवीन तुर बाजारात येत असल्याने आवक कमी आहे. नवीन तुरीमध्ये काहीसा ओलावा असूनही त्याला योग्य दर मिळत आहे. नवीन तुर बाजारात उशिरा येत असल्याने तुरीच्या दरात तेजी कायम राहू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. तुर लागवड मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने या वर्षी तुरीचे दर समाधानकारक असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने तूर आयात करावी लागणार आहे. त्यामुळे या वर्षी तुरीला 7 ते 8 हजार असा भाव राहील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी योग्य वेळी तुरीची विक्री करणे महत्वाचे आहे. 

वातावरणाचा तुरीवर होणारा परिणाम (Effect of Atmosphere on Tur)

पावसामुळे तर तुरीचे नुकसान झालेच परंतु आता अधिक ढगाळ वातावरणामुळे तुरीमध्ये अळी पडण्याची शक्यता आहे. तुरीमध्ये अळयांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात अधिक घट होऊ शकते, त्यामुळे योग्य फवारणी आणि काळजी घेणे या स्थिति मध्ये अत्यंत महत्वाचे आहे.