Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR रिटर्न भरण्याची मुदत वाढणार का?

LAST DATE OF ITR

इन्कम टॅक्स विभागाने आणलेल्या नवीन ई-फायलिंग पोर्टलबाबत अनेक करदात्यांनी तक्रारी दाखल केल्याने विभाग यावर्षीही आयटीआर रिटर्न भरण्याची मुदत (ITR filing last date) वाढवण्याची शक्यता आहे?

आर्थिक वर्ष 2021-22 आणि एसेसमेंट वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 (last date to file ITR 2022-23) आहे. गेल्या दोन वर्षांत, कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली भयाण परिस्थिती तसेच इन्कम टॅक्स विभागाने नव्याने सुरू झालेल्या पोर्टलमधील अडचणींमुळे सरकारने आयटीआर फाईल आणि इन्कम टॅक्सशी संबंधित गोष्टींची मुदत वाढवली होती. पण आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने यावर्षीची आयटीआर भरण्याची मुदत वाढवणार का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. काही तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंत फारच कमी लोकांनी रिटर्न फाईल केले आहे. अजून किमान 6 कोटीहून अधिक करदात्यांनी आपले रिटर्न फाईल केलेले नाही. त्यामुळे रिटर्न फाईल करण्याची मुदत वाढवली जाईल (will ITR filing date be extended) अशी शक्यता काही जण व्यक्त करत आहेत.


ई-फायलिंग करताना करदात्यांना अडचणी!

इन्कम टॅक्स विभागाने, 2 जुलै, 2022 रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर मान्य केले होते की, करदात्यांना ई-फायलिंग वेबसाईटवर रिटर्न फाईल करताना किंवा आयटीडी ई-फायलिंग पोर्टलमध्ये प्रवेश करण्यात अडचणी येत आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण यामुळे काही करदात्यांची गैरसोय होऊ शकते, याबद्दल विभागाने खेद व्यक्त केला होता.

अजून 6 कोटी करदात्यांचे रिटर्न पेंडिग

ई-फायलिंग वेबसाईटवर रिटर्न फाईल करताना करदात्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तशा तक्रारी ही विभागाकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकार यावर्षीही आयटीआर भरण्याची मुदत वाढवण्याची शक्यता (will ITR filing date be extended) काही जणांकडून वर्तवली जात आहे? तसेच काही टॅक्स तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत खूपच कमी लोकांनी आपले Tax Return File केले आहे. अजून सुमारे 6 कोटींहून अधिक करदात्यांनी रिटर्न फाईल केलेले नाही, असे माजी आयआरएस अधिकारी आणि Taxbuddy.comचे संस्थापक सुजित बांगर यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत 99 लाख आयटीआर दाखल!

इन्कम टॅक्स विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या सात दिवसांत फक्त 30 लाख आयटीआर दाखल झाले आहेत. तर 7 जुलैपर्यंत दाखल झालेल्या एकूण आयटीआरची संख्या 99 लाख आहे. म्हणजे अजून सुमारे 6.5 कोटी आयटीआर फाईल होणं बाकी आहे. अंतिम तारीख 31 जुलै पाहता आजच्या दिवसापासून फक्त 16 दिवस शिल्लक आहेत. इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या संख्येने आयटीआर रिटर्न दाखल करणं हे एक मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे ही तारीख वाढवावी, अशी काही जणांची अपेक्षा आहे.

तारीख वाढविण्याचा विचार करावा लागेल?

इन्कम टॅक्स विभागाने नवीन वेबसाइट सुरू करून एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तरी पोर्टलवरील अडचणी कमी झालेल्या नाहीत. कदाचित आयटीआर लवकर दाखल करण्याच्या प्रयत्नात आणि शेवटच्या तारखेपर्यंत वाट न पाहणाऱ्या करदात्यांमुळे साईटवर ताण येण्याची शक्यता असू शकते. पण, शेवटपर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर इन्कम टॅक्स विभागाला रिटर्न फाईल करण्याची तारीख वाढविण्याचा विचार करावा लागेल, असं मत आकांक्षा गोयल (डायरेक्ट टॅक्स पार्टनर, टी. आर. चढ्ढा अँड कंपनी एलएलपी) यांनी व्यक्त केलं आहे.