2000 Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यासोबतच या नोटा चलनातून बाहेर पडण्यासाठी आरबीआयने वेळ दिला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत लोकांना या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये जावे लागणार आहे. 23 मे पासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 2000 रुपयांच्या नोटांवर बंदी की रद्द करण्यात आल्या? याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
2000च्या नोटेचा उद्देश पूर्ण झाला
आरबीआयने जारी केलेल्या प्रेस रिलीझनुसार, 2000 रुपयांची नोट जारी करण्याचा उद्देश त्यावेळी अर्थव्यवस्थेची चलनाची गरज पूर्ण करणे हा होता. इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर हे उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे 2018-19मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.
2000च्या नोटा बंद झाल्यात का?
आरबीआयच्या प्रेस रिलीझमध्ये असेही म्हटले आहे, की सामान्यतः 2000ची नोट सध्या व्यवहारांसाठी वापरली जात नाही. आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, आरबीआयकडून 2000 रुपयांची नोट बंद न करता ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने या धोरणाला 'क्लीन नोट पॉलिसी' असे नाव दिले आहे.
सध्या चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदाच राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या बँकांना या 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास आणि त्या बदलण्याची सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच बँकांनी आतापासून 2000 रुपयांच्या नोटा देणे तातडीने बंद करावे, असेही म्हटले आहे. तुमच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी भरपूर वेळ आहे. जर तुमच्याकडे 2000 च्या नोटा असतील तर 23 मे पासून तुम्ही फक्त 20,000 जमा करू शकाल.