• 05 Jun, 2023 19:54

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI withdrawn 2000 Note: तुमच्याकडच्या नोटा बनावट तर नाहीत ना? 'अशी' ओळखा 2000 रुपयांची खरी नोट

RBI withdrawn 2000 Note: तुमच्याकडच्या नोटा बनावट तर नाहीत ना? 'अशी' ओळखा 2000 रुपयांची खरी नोट

RBI withdrawn 2,000 notes : आरबीआयनं आदेश दिल्यानंतर आता 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. ग्राहकांना बँकेतून 2000ची नोट आता मिळणार नाही. तशा स्पष्ट सूचनाही आरबीआयनं बँकांना दिल्यात. तुमच्याकडच्या 2000च्या नोटाही तुम्हाला बदलून घ्याव्या लागणार आहेत. मात्र त्या खऱ्या आहेत का, हे तपासणंही गरजेचं आहे.

सरकार 2000ची नोट बंद करणार असल्याचं मागच्या अनेक दिवसांपासून बोललं जात होतं. बाजारातूनही दोन हजारची नोट गायब झाली होती. कधीतरी ती निदर्शनास येत होती. सर्वसामान्यांचा हा अंदाज खरा ठरलाय. सरकार या दोन हजारांच्या नोटा बंद करणार आहे. आरबीआयनं (Reserve bank of India) सरकारला दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्यास सांगितलंय. सध्या ज्यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा असतील त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा करायच्या आहेत. मात्र ही पूर्ण नोटाबंदीसारखी (Demonetisation) बंदी नाही. अचानक नोट बंद केल्याची घोषणा नाही. त्यामुळे नागरिकांकडे बाद झालेली ही नोट बदलण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

...तर होईल आर्थिक नुकसान

ज्यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा असतील त्यांनी बँकेत 30 सप्टेंबरपर्यंत त्या जमा कराव्यात. यासाठी काही नियम निश्चित करण्यात आलेत. अनेकवेळा बनावट नोटांबाबत तक्रारी ऐकायला मिळतात. तुम्ही बँकेत गेलात आणि तुमच्या नोटा बनावट आहेत, असं बँकेनं सांगितल्यास काय स्थिती निर्माण होईल, याचा अंदाज करता येवू शकतो. तुम्हाला त्या नोटा बदलून मिळणार नाहीत. शिवाय तुमचं आर्थिक नुकसानही होईल. याच्यावरचा उपाय म्हणजे खरी आणि बनावट नोट ओळखणं... तुम्हाला बनावट नोट ओळखता यायला हवी. जाणून घेऊ खरी आणि बनावट नोट यांच्यातला फरक...

'असा' ओळखा फरक

  • लख्ख प्रकाशात नोटेला पाहिल्यास 2000 रुपये तुम्हाला चमकताना आढळतील. हे वैशिष्ट्य फक्त खऱ्या किंवा वास्तविक नोटमध्येच उपलब्ध आहे.
  • नोटेला 45 अंशांवर त्रिकोण करून पाहिल्यावर त्यावर 2000 लिहिलेलं तुम्हाला दिसेल. हे एक हिडन फीचर आहे. हे देवनागरी लिपीत लिहिलेलं असलं पाहिजे.
  • नोटेच्या मध्यभागी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो दिसेल. त्याचवेळी एक लहान इंडिया (INDIA) असंदेखील लिहिलेलं असेल.
  • नोटेच्या उजव्या बाजूला चमकणाऱ्या धाग्यात भारत, RBI आणि 2000 असं लिहिलेलं आढळून येईल. जर नोट थोडी वळवली तर तिचा रंग हिरवा ते निळा असा बदलेला दिसून येईल.
  • जिथे महात्मा गांधींचा फोटो असेल, तिथे इलेक्ट्रोटाइपमध्ये 2000चा वॉटरमार्क दिसेल.
  • नोटेच्या उजव्या बाजूला अशोक स्तंभ दिसून येईल. यासोबतच आयबीआयच्या गव्हर्नरचं वचन आणि स्वाक्षरी असेल.
  • ज्या वर्षी नोट छापली जाते ते वर्ष नोटेवर नक्कीच लिहिलेलं असतं. यासोबतच स्वच्छ भारतच्या लोगोसह त्याची घोषणादेखील लिहिलेली आढळून येते.
  • भारताच्या मंगळयानाची मोटिफ-इंटरप्लॅनेटरी स्पेस इमेजदेखील नोटेवर तुम्हाला दिसून येईल.

30 सप्टेंबरपर्यंत बदलता येतील नोटा

तुमच्याकडे असणाऱ्या 2000च्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलता येतील. नोटा बदलण्याची प्रक्रिया 23 मेपासून सुरू होणार असून 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या दरम्यान तुम्ही एका दिवसात 20 हजार रुपये एक्स्चेंज करू शकता. कोणत्याही सार्वजनिक बँकेत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. नेहमीच्या पद्धतीनं नागरिक आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन नोटा बदलू शकतात.